Kolhapur Police Seize Goa Made Liquor Dainik Gomantak
गोवा

Kolhapur Crime: कारच्या सीटमध्ये, डिकीत लपवली दारु; कोल्हापुरात गोवा बनावटीचा 6.19 लाखांचा मद्यसाठा जप्त

Goa Made Liquor Seized In Kolhapur: संभाजीनगर येथे एक कार गोवा बनावटीच्या दारु वाहतूक करुन येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती.

Pramod Yadav

कोल्हापूर: गोव्यातून आणलेला विदेशी मद्यसाठा संभाजीनगर, कोल्हापूर येथे जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक एकने १३ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री दीड वाजता ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाने ६.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, कोल्हापूर येथील एका २४ वर्षीय युवकाला अटक केली आहे.

गणेश चन्नाप्पा कलगुटगी (२४, रा. कोर्स नाका, संभाजी नगर, ता, करवीर, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. उत्पादन शुल्क विभागाने एक लाख १९ हजार ९४० रुपयांचे मद्य आणि चारचाकी (MH05 BL 0785) असा एकूण ६ लाख १९ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संभाजीनगर येथे एक कार गोवा बनावटीच्या दारु वाहतूक करुन येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने इंडियन ऑईल पेट्रोल पंप असलेल्या चौकात सापळा रचून संबधित तरुण वाहन घेऊन आल्यानंतर त्याला थांबवून त्याची चौकशी करण्यात आली. तसेच, वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासाअंती वाहनात मद्यसाठा आढळून आला.

अधिकाऱ्यांना तपासाअंती कारमध्ये गोवा राज्यात निर्मिती केलेल्या विदेशी मद्याने भरलेल्या ७५० मिलीचे १४ बॉक्स आढळले. पोलिसांनी मद्यसाठा तसेच, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी जप्त केली आहे. आरोपी मद्यसाठा कोठे घेऊन निघाला होता. यात आणखी साखळी आहे का? याचा शोध पोलिस घेतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT