Goa 1200 Representatives Asset Declaration ai generated images
गोवा

Goa Undeclared Assets: गोव्यातील 1200 लोकप्रतिनिधींची नावे जाहीर! मालमत्तेचे विवरणपत्र न दिल्याने लोकायुक्तांची कारवाई

Goa 1200 Representatives Asset Declaration: नोटीस बजावूनही २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता आणि दायित्वांचे विवरणपत्र सादर न करणाऱ्या सुमारे १२०० लोकप्रतिनिधींची नावे गोवा लोकायुक्त संदीप शिंदे (निवृत्त न्यायमूर्ती) यांनी जाहीर केली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नोटीस बजावूनही २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता आणि दायित्वांचे विवरणपत्र सादर न करणाऱ्या सुमारे १२०० लोकप्रतिनिधींची नावे गोवा लोकायुक्त संदीप शिंदे (निवृत्त न्यायमूर्ती) यांनी जाहीर केली आहेत. या यादीत आमदार, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य आणि पंचायत सदस्यांचा समावेश आहे.

कायद्यानुसार लोकप्रतिनिधींना दरवर्षी ५ नोव्हेंबरपर्यंत आपली मालमत्ता आणि दायित्वांची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. गोवा अधिनियम २०१२ मधील तरतुदींनुसार, विहित नमुना क्रमांक ३ मध्ये हे विवरणपत्र सादर करावे लागते. मात्र, मुदत देऊन आणि नोटीस बजावूनही संबंधित लोकप्रतिनिधींनी या नियमाचे पालन केले नाही.

३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मालमत्तेचा तपशील सादर करणे आवश्यक होते. मात्र, यादीतील लोकप्रतिनिधींनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतही विवरणपत्रे सादर केली नव्हती. यासंदर्भात ८ ऑगस्ट २०२६ रोजी सक्षम प्राधिकरणांकडे अहवाल पाठवण्यात आला होता. त्याच्या प्रती संबंधित लोकप्रतिनिधींनाही देण्यात आल्या होत्या.

त्यानंतर गोवा लोकायुक्त कायदा, २०११ च्या कलम २१(२) अन्वये संबंधित लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली. लोकप्रतिनिधींना मालमत्ता जाहीर करणे बंधनकारक असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल लोकायुक्तांनी घेतली आहे.

एक आमदार; पणजीचे १० आजी-माजी नगरसेवक

जाहीर केलेल्या यादीत नुवेचे आमदार आलेक्सो अँटोनियो द पिएदाद सिक्वेरा यांच्यासह पणजी महानगरपालिकेच्या दहा आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील इतर नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य आणि विविध पंचायतींच्या सदस्यांची नावेही या यादीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: साळगावचा कचरा प्रकल्प 25 दिवस बंद! उत्तर गोव्यात कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

खरी कुजबुज: शतक कोण ठोकणार, 'बोल्‍ड' कोण होणार?

Land Mutation Process: 'म्युटेशन'साठी 50 हजारांपर्यंत वसुली? दक्षिण गोवा वकील संघटनेचा भ्रष्टाचाराचा आरोप

Horoscope 14 Oct 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! 'या' 5 राशींचं चमकणार नशीब; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT