Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आज 200 नवे कोरोना रूग्ण, 122 जणांना डिस्चार्ज

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे, गेल्या चोवीस तासांत संपूर्ण राज्यात 200 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर, 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या वाढून 877 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आज दिवसभरात एकही रूग्णांचा मृत्यू झालेला नाही.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 54 हजार 351 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 49 हजार 518 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.10 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे 3,956 रूग्ण दगावले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 1,389 प्रयोगशाळा नमुने तपासले आहेत.

तसेच, देशात देखील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 9,062 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 36 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 05 हजार 058 रूग्ण उपचाराधीन आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT