Goa Locals angry saying dont want free but give regular water Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारचे आश्वासन फोल! मोफत नको पण नियमित पाणी द्या म्हणत स्थानिक संतप्त

गोवा सरकारने मोफत पाणी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, नळांना पाणीच येत नाही तर या आश्‍वासनांचा काय उपयोग, असा सवाल काही स्थानिकांनी केला.

दैनिक गोमन्तक

शिवोली/पणजी: सरकारने (Goa Government) प्रत्येक कुटुंबाला 16 घनलिटर पाणी मोफत (Free Water)देण्याची घोषणा केली असली तरी किनारपट्टी भागात अजूनही लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. या घोषणेचा लाभ अजूनही लोकांना मिळालेला नाही. उलट पूर्वीपेक्षा अधिक पाण्याची बिले येऊ लागल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. रोजच पाणी समस्येला सामोरे जावे लागणाऱ्या हणजूण- वागातोर येथील स्थानिकांनी रास्ता रोको केला.

मोफत पाणी देण्याऐवजी किमान विकत; पण नियमित पाणी द्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. गेल्या कित्येक वर्षांपासून शापोरा, हणजूण, वागातोर व कायसूव या भागांत पाण्याची समस्या आहे. यासंदर्भात अनेक निवेदने सरकारला तसेच बांधकाम खात्याला देण्यात आली. वेळोवेळी पाण्यासाठी मोर्चा व आंदोलने करण्यात आली, तरी या सरकारला जाग येत नाही. या सरकारने मोफत पाणी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, नळांना पाणीच येत नाही तर या आश्‍वासनांचा काय उपयोग, असा सवाल काही स्थानिकांनी केला. शिवोली पंचक्रोशीतील गुडे, शापोरा, तसेच हणजूण, वागातोर या गावांना गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील मोर्चा रद्द

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी किनारी भागातील लोक गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणार होते. मात्र, बुधवारी रात्री सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापशातील अधिकाऱ्यांनी तातडीने किनारी भागात जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच आज, गुरुवारी कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे लोकांनी मोर्चा नेण्याची घोषणा मागे घेतली. अस्नोडा पाणी प्रकल्पाचे तातडीने दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असल्याने आज आणि 16 नोव्हेंबर रोजी संपूर्ण बार्देश तसेच डिचोली तालुक्यातील काही भागांमध्ये मर्यादित पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे परिपत्रक पाणीपुरवठा विभागाने जारी केले आहे.

अभियंत्यांची पळता भुई

सरपंच सावियो आल्मेदा हे मध्यस्थी करत असतानाच आंदोलनस्थळी दाखल झालेल्या म्हापशातील साबांखाच्या अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमार करीत ग्रामस्थांनी त्यांना सळो की पळो करून सोडले. यावेळी हणजूण कायसूवचे सरपंच पेट्रीक सावियो आल्मेदा, पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर, शीतल दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते विष्णू नाईक, गजानन तिळवे, योगेश गोवेकर तसेच नागरिक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

SCROLL FOR NEXT