गोव्यात महिला सुरक्षेसाठी आता ‘पिंक फिमेल फोर्स’

सुरक्षिततेच्या दृष्टीने खासकरून महिलांबाबत पोलिस खात्याने गंभीर दखल घेऊन ठोस पावले उचलायला हवीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जी काही मदत पोलिस खात्यासाठी लागेल, ती सरकारकडून दिली जाईल.
CM dr. Pramod Sawant Attended  Valedictory function for training of DYSP's of Goa Police Service.
CM dr. Pramod Sawant Attended Valedictory function for training of DYSP's of Goa Police Service. Twitter/ @DrPramodPSawant
Published on
Updated on

पणजी: राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस खाते काम करत आहे. पोलिस तपासकामाची गोव्याची (Goa) टक्केवारी देशात सर्वाधिक आहे. महिलांना सुरक्षितता देण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोलिस खात्यात ‘पिंक फिमेल फोर्स’ (Pink Female Force) हे सक्षम महिला पोलिस दल (Women's police force ) उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM pramod Sawant) यांनी दिली.

कदंब पठारावरील एका हॉटेलमध्ये ‘जीपार्ड’तर्फे कनिष्ठ राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या समारोप समांरभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव परिमल राय, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा, महानिरीक्षक राजेश कुमार, पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, गृह विशेष सचिव अंकिता आनंद, ॲड. सार्दिना उपस्थित होत्या.

CM dr. Pramod Sawant Attended  Valedictory function for training of DYSP's of Goa Police Service.
आप नेते विश्वेश परब काँग्रेसमध्ये करणार प्रवेश !

यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याची गरज आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खासकरून महिलांबाबत पोलिस खात्याने गंभीर दखल घेऊन ठोस पावले उचलायला हवीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जी काही मदत पोलिस खात्यासाठी लागेल, ती सरकारकडून दिली जाईल. त्यासाठी या अधिकाऱ्यांनी घेतलेले प्रशिक्षण आपल्या सहकाऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहचायला हवी.

CM dr. Pramod Sawant Attended  Valedictory function for training of DYSP's of Goa Police Service.
राज्यातील सुमारे 40 पंचायतींना योग्य ती मदत देणार; मावीन गुदिन्हो

महिला पोलिसांची भरती सुरू : दरम्यान, पोलिस खात्यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासकामात काहीवेळा अडचणी येतात. त्यामुळे ही संख्या वाढवण्यासाठी पोलिस खात्यात नोकर भरती सुरू आहे. त्यामुळे खात्यात लवकरच सक्षम महिला पोलिस दल स्थापन होण्याची शक्यता आहे.

CM dr. Pramod Sawant Attended  Valedictory function for training of DYSP's of Goa Police Service.
राज्यातील सुमारे 40 पंचायतींना योग्य ती मदत देणार; मावीन गुदिन्हो

लोकांशी मित्रत्वाचे नाते जोपासा

पोलिस खात्याने परिस्थितीनुसार गुन्हेगारीसंदर्भातील विविध सूचना सरकारकडे पाठवल्यास त्यावर योग्य विचार करून तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन देतानाच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम महिला पोलिस दलाची गरज आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची हल्लीच बैठक घेतली. त्यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. या महिला पोलिस समाजात लोकांबरोबर मित्रत्वाचे नाते जोपासण्याबरोबरच गुन्हेगारी तपासातही अधिक सक्षम होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com