Goa Live Updates | Congress - Bjp conflicts Dainik Gomantak
गोवा

Goa Live Updates : गोव्यात 15 जुलैपर्यंत तुफान पाऊस

11 ते 15 जुलैपर्यंत मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू 

सकाळपासून गोव्यात मुसळधार नसला तरी पावसाची संततधार सुरूच आहे. काल पावसाने थोडी उसंत घेतली होती.

...त्यामुळे पार्टी सोडण्याचा विषय येत नाही : दिगंबर कामत

मी काँग्रेसमध्येच मी रिटायर्ड हर्ट असलो तरी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही पाठीमागच्या विधानसभेवेळी मी एकटा आमदार उरलो होतो त्यामुळे पार्टी सोडण्याचा विषय येत नाही : दिगंबर कामत

कॉंग्रेसचे आमदार फुटले ही चांगलीच गोष्ट झाली : सुदिन ढवळीकर

कॉंग्रेसचे आमदार फुटले ही चांगलीच गोष्ट झाली. आता त्यांना कळेल की आमदारांना सांभाळणं किती अवघड असते ते. जे मला चांगलंच माहीत आहे. : सुदिन ढवळीकर

मला जायचे असेल तर मी गेलो असतो : दिगंबर कामत

मला जायचे असेल तर मी गेलो असतो. मला कोणीही रोखू शकत नाही. पण तरीही, मी आघाडीतून पक्षाचे नेतृत्व केले. आणि अचानक, निकाल आल्यावर त्यांनी मला LoP मधून बदलले. त्याने असे विधान का केले ते मला माहित नाही. मी काँग्रेसमध्ये आहे, तुम्ही माझी कामगिरी पाहू शकता : दिगंबर कामत

दुपारपर्यंत नवा विरोधी पक्षनेता निवडला जाईल : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर

विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबो यांची हकालपट्टी केली असून त्यासंबंधीचे पत्र आता आपण सभापती रमेश तवडकर यांना सादर केले आहे. दुपारपर्यंत नवा विरोधी पक्षनेता निवडला जाईल ती माहिती ही सभापतींना सादर केली जाईल : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर

अरविंद केजरीवालांनी आधीच सांगितलं होतं की कॉंग्रेसचे आमदार विकले जाणार : हेंझी व्‍हिएगस

आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधीच सांगितले होते, की काँग्रेस पक्ष नेहमीच विकला जाणार. याआधीही तो विकला गेला आणि यापुढेही तो विकला जाणार,किंवा कॉंग्रेसचे आमदार पक्षांतर करणार : आप नेते व्‍हेंझी व्‍हिएगस यांनी कॉंग्रेस आणि भाजपवर टीका

काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलोय; अजूनही काँग्रेससोबतच

आपण काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलो असून अजूनही काँग्रेससोबतच असल्याचा दावा लोबो यांनी केला आहे. मात्र काँग्रेसकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असून आपल्याला पदावरुन दूर केल्याचंही मायकल लोबोंनी स्पष्ट केलं आहे. तसंच सरकारमधील मंत्र्यांकडून आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात असून आपल्यावर कारवाईही केली जात आहे. अशा परिस्थितीत आपण विरोधी पक्षनेतेपदी राहणं कठीण असल्याचं पक्षनेतृत्त्वाला कळवल्याचंही लोबोंनी स्पष्ट केलं आहे.

दाबोळी विमानतळाचे कामकाज बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : डॉ. प्रमोद सावंत

दाबोळी विमानतळाचे कामकाज बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, मोपा विमानतळानंतरही दाबोळी सुरू राहणार का, संकल्प आमोणकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर दिले.

झाडे कोसळून घरांचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देणार : बाबूश मोन्सेरात

आजपासून गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान सर्व विद्यमान आमदारांनी गोव्यातील महत्वाचे विषय विधानसभेत मांडले. दरम्यान, पावसामुळे घरावर झाडे कोसळून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे अशांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन बाबूश मोन्सेरात यांनी दिले.

त्याचबरोबर, जी झाडे धोकादायक आहेत, त्यांना मुळापासून कापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

...त्यावेळी तर मी झोपलो होतो; राजेश फळदेसाई

काँग्रेसच्या बैठकांबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीबद्दल मला काहीच माहीत नव्हते. पण मी अजूनही कॉंग्रेसमध्येच आहे. मी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो नव्हतो. मी त्यावेळी माझ्या घरी झोपलो होतो. त्यामुळे याबद्दल मला काहीही कल्पना नाही.'

CM Pramod Sawant : आम्हाला कुणाचीही गरज नाही, आमचे स्थिर सरकार आहे

'आम्हाला कुणाचीही गरज नाही. आमचे 25 आमदारांसोबतचे स्थिर भाजप सरकार गोव्यात स्थापन झाले आहे. आता काँग्रेसकडे करण्यासाठी काहीही नसल्यामुळे ते सध्या दोष देण्याचा ड्रामा करत आहेत.'

दिगंबर कामत आणि मायकल लोबोंविरोधात अपात्रता याचिका

आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबोंविरोधात गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर प्रदेश काँग्रेस अपात्रता याचिका दाखल करणार आहे. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Goa Rain Alert : गोव्यात 15 जुलैपर्यंत तुफान पाऊस

हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, 15 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीलगतच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या संभाव्य तीव्रतेमुळे, 12 जुलैपासून गोव्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. 11 ते 15 जुलैपर्यंत मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT