Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Multi-crore Scam Exposed in Goa: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Marathi Breaking News 24 November 2024 : आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सेंट झेवियर शव प्रदर्शन आणि गोव्यातील महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

130 कोटींचा घोटाळा उघड, सर्वांवर कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली तंबी

राज्यातील सर्वात मोठा 130 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत तपास सुरु केला आहे. फातोर्डा-मडगाव ते लंडन अशी घोटाळ्याची व्याप्ती. सर्वांवर कारवाई होणार. अशी तंबी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्याचा सन्मान! बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस पुरस्काराने गौरव

ताश्कंद येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यात गोव्याचा बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस या पुरस्कराने गौरव करण्यात आला. उझबेकिस्तान पर्यटन समितीने एसयुईचे संचालक दिलशाद बहादिरोवीच यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले!

शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींना गंडा घालण्यात आला. मायरॉन रॉड्रिग्ज आणि त्याची पत्नी दीपाली परब या दोघांविरोधात गोवा पोलिसांनी तक्रार नोंदवली.

55 व्या इफ्फीला बॉलिवूड स्टार रणबीर कपूरची हजेरी!

बॉलिवूड स्टार रणबीर कपूरने 55 व्या इफ्फीला हजेरी लावली. 'द ग्रेट शोमन'च्या माध्यमातून राज कपूर यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला आहे.

हणजूण ग्रामसभा तापली; संगीत महोत्सवावरुन दोन गटात मारहाण

णजूण ग्रामसभेत रविवारी (दि. २४ नोव्हेंबर) रोजी बरीच खळबळ उडाली. डॉ. इनासिओ फर्नांडिस या स्थानिकांने संगीत कार्यक्रमाला विरोध दर्शवल्यानंतर त्याला इतरांकडून मारहाण करण्यात आली. या ग्रामसेभेत दोन गट सामील होते, एक गट संगीत कार्यक्रमांचे समर्थन करत होता तर तर दुसरा गट संगीत कार्यक्रमांच्या विरोधात होता. हा एकूण प्रसंग आटोक्यात आणण्यासाठी गोवा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि आता घडलेल्या एकूण प्रसंगामुळे ही ग्रामसभा १५ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

''भाजपला राज्यातील विरोधकांना संपवाचंयं, पण ते शक्य नाही...'', सरदेसाईंचा हल्लाबोल!

महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक गप्प बसणार नाहीत. भाजपला गोव्यातील विरोधकांना संपवायचे आहे, पण ते अशक्य आहे. सरदेसाईंचा हल्लाबोल.

अतिक्रमणे हवटण्यासाठी राबवण्यात येणार विशेष मोहीम; रुमडामळ ग्रामसभेत ठराव!

रुमडामळ ग्रामसभेत गॅस सिलिंडर स्फोटाबाबत चर्चा. दुकानांच्या सुरक्षेबाबत सर्वेक्षण केले जाईल. तसेच, संबंधित विभागांना पत्रही देण्यात येणार. सोमवारपासून मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरु करण्याचा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला.

वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. सुभाष प्रधान असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा ओडिशातील असून गोव्यातील कांदोळी येथे राहत होता.

प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनाला आता महिलांसह पंचायत मंडळाचा पाठिंबा मिळालेला असून प्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावर ठाण मांडून बसण्याचा महिलांचा निर्धार केलाय.

मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

मडगाव येथे कचऱ्याच्या ढिगाला अचानक भीषण आग लागली, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT