Goa Live Updates 08 January 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa News 08 January 2024: मार्केटमधल्या वादाचे रूपांतर मारहाणीत; संशयिताच्या मुसक्या आवळल्या

Kavya Powar

मार्केटमधल्या वादाचे रूपांतर मारहाणीत; संशयिताच्या मुसक्या आवळल्या

म्हापसा महानगरपालिका मार्केटमध्ये झालेल्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

या घटनेतील संशयित आरोपी अज्जू उर्फ अझरुद्दीन हवांगी शेख (वय 29) याला पोलिसांनी सापाला रचत त्याला अटक केलीय. तसेच त्याच्याकडून मारहाणीची वापरलेले हत्यारही जप्त केलंय.

अधिवेशनाबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारला दिलाय 'हा' इशारा

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रश्नांचे समान वाटप करण्याची लॉट पद्धत बंद केलीय. याबाबत सभापतींची भेट घेणार असून हा प्रकार थांबला नाही तर आगामी विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकू, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला आहे. सातही विरोधी आमदारांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आलेमाव बोलत होते.

गोव्याकडे यंदा पर्यटकांची पाठ

पर्यटनाची राजधानी म्हणून देशासह विदेशातही ओळख असणाऱ्या गोव्यात यंदा एक वेगळेच संकट दिसून आलेय. बारमाही हाऊसफुल असणाऱ्या गोव्याकडे यंदा पर्यटकांनी अक्षरशः पाठ फिरवलीय. विशेष म्हणजे यात विदेशी पर्यटकांची संख्या जास्त आहे.

खरंतर गोव्यात ऑक्टोबर पासून पर्यटन हंगामाला सुरूवात होते. मात्र यंदा नववर्षाच्या सेलिब्रेशन नंतर किनारी भागात काहीसा शुकशुकाट पाहायला मिळतोय.

बिर्ला येथे अवैध कचरा डंपिंग साईटला भीषण आग; दोन लाखांचे नुकसान

बिर्ला येथे कचरा डंपिंग साईटला भीषण आग लागली असून या याठिकाणी वर्षानुवर्षे कचरा साठवला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पंचायतीने मात्र याला नकार दिला आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होत जवानांनी आग आटोक्यात आणलीय. या आगीत अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे समजतेय.

सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये बाळाचा खून 

गोव्यातील सिकेरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पोटच्या चार वर्षीय बाळाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

महिलेने सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये बाळाचा खून केला आणि मृतदेह बॅगेत भरुन ती पसार झाली. दरम्यान, चित्रदुर्ग येथे संशयित महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकरी पुन्हा आझाद मैदानावर परतले....

इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारी बंगल्यावर जाण्याच्या पवित्र्यात असलेला मोर्चा पोलिसांनी अडवला. यावेळी सरकारी प्रतिनिधी ऊस आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकरी पुन्हा आझाद मैदानावर परतले.

गोव्याच्या महिलांचा तिसरा विजय

तरन्नुम पठाण (३२) व दिव्या नाईक (२९) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या अभेद्य ६६ धावांच्या भागीदारीमुळे गोव्याने सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. गोव्याने त्रिवेंद्रम येथे उत्तर प्रदेशला ५ विकेट राखून हरविले.

CMच्या बंगल्यावर जाणारा मोर्चा अडवला; राजकीय नेते, शेतकरी ताब्यात

इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारी बंगल्यावर जाण्याच्या पवित्र्यात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना परत घेऊन या, मुख्यमंत्री येईपर्यंत आझाद मैदानावर शांततेने बसण्याची शेतकऱ्यांची तयारी

बेळगाव चोर्ला घाटावर पहाटे चार वाजता अपघात. सकाळी आठ वाजता वाहतूक सुरळीत

चोर्ला घाट

मी धनगर समाजाचा मानहानीकारक उल्लेख केला नाही- डिकॉस्टा

''मी शेळी आणि कोल्ह्याबद्दल फक्त एक गोष्ट सांगितली असून माझ्या भाषणात धनगर समाजाचा मानहानीकारक उल्लेख केलेला नाही. निवडणुकीत मतांसाठी कवळेकर धनगर समाजातील लोकांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्टीकरण आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी दिलंय.

गावकर यांना घरासाठी आर्थिक मदत देणार- देविया राणे

आमदार देविया राणे यांनी वासुदेव गावकर (हिवरे-बुद्रुक सत्तरी) यांच्या घराचे आगीत नुकसान झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच, गावकर यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा राणे यांनी केली आहे. संकटातही आम्ही लोकांच्या पाठीशी उभे असल्याचे राणे म्हणाल्या.

जेईआरसी जनसुनावणीत वीज दरवाढीला विरोध

जेईआरसी जनसुनावणीत वीज दरवाढीला विरोध. तोट्याला आळा घालण्यासाठी दरवाढ समर्थनीय नाही. वीज विभागाने प्रलंबित थकबाकी वसूल करावी आणि महसूल गळती दूर करावी, असा लोकांचा युक्तिवाद आहे. पण, मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी वीज दरात 6 टक्के वाढ योग्य असल्याचे सांगितले.

मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

केपेत धनगर समाजाला एसटी दर्जा देण्यास विरोध

केपे मतदारसंघातील एसटी समाजाच्या पंच सदस्यांकडून धनगर समाजाला एसटी दर्जा देण्यास विरोध. याप्रसंगी समाजातील नागरिक संतप्त. गरज पडल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा.

पाद्रीभाट-नेसायमध्ये महिलेची हत्या; अधिक तपास सुरू

पाद्रीभाट-नेसाय येथील फ्लोरीना फर्नांडिस (53) या महिलेचा खून केल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी मारिओ ओलिवेरा याला ताब्यात घेतले. प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती. अधिक तपास सुरू

गोव्यातून तेलंगणात मद्याची तस्करी; कदंब बस ड्रायव्हर-कंडक्टर ताब्यात

तेलंगणा अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी गोव्यातून तेलंगणामध्ये मद्याची तस्करी करणाऱ्या कदंब बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला काल (7 जानेवारी) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास सुरू.

ऊस उत्पादक शेतकरी धडकले पणजीत!

संजीवनी साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसह ऊस उत्पादक शेतकरी पणजी आझाद मैदानावर पोहोचले. दुपारपर्यंत दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देण्याचा दिला इशारा.

गोव्यातील पहिल्या स्टेम लॅबचे उदघाटन

गोव्यातील पहिल्या स्टेम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग व मेकानिकल) लॅब व स्किल डेव्हलपमेंट लायब्ररीचे साखळीत उदघाटन. यापुढे कौशल्य शिक्षणाशिवाय नोकरीच्या आशा अंधुक. राज्य सरकार कौशल्य विकास शिक्षणासाठी गंभीर. मुख्यमंत्र्यांची माहिती

Nestle कंपनीजवळ कारचा स्वयंअपघात

उसगाव येथील नेसले (Nestle) कंपनीजवळ कारचा स्वयंअपघात. सुदैवाने घटनेत कुणीही जखमी नाही. माहिती नुसार कार नवीनच असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सत्तरीत शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

हिवरे बुद्रुक सत्तरी येथे वासुदेव गावकर यांच्या घराला मध्यरात्री 3 च्या सुमारास भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान. वाळपई आणि डिचोली अग्निशमन दलाकडूल 8000 लिटर पाणी आग विझवण्यासाठी वापरण्यात आले. आग नियंत्रणात.

बायणा किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स बोटीवर काम करणाऱ्या युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू...

बायणा समुद्रकिनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 23 वर्षीय विशाल नाईक हा किनाऱ्यावरील जलक्रीडा करणाऱ्या एका नौकेवर कामाला होता.

पर्पल फेस्टिव्हलची ठळक वैशिष्‍ट्ये

  • सुमारे ६५०० दिव्यांगांचा सहभाग

  • ४५ एनजीओ करणार प्रतिनिधित्व

  • ‘दिव्यांग’ विषयावर ३० परिषदा

  • विविध प्रकारचे २०० स्टॉल्स

  • १८० दिव्यांगप्रेरित सिनेप्रदर्शन

  • दिव्यांगांना मोफत उपकरणांचे वाटप

  • २५०० दिव्यांग क्रीडापटू दाखल

  • ११,५००हून अधिक प्रतिनिधींची नोंदणी

दिव्यांगांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज; आजपासून पर्पल फेस्टिव्हल 

गोवा राज्य दिव्यांग आयोगातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्‍त आज सोमवार दि. ८ जानेवारीपासून सुरू होत आहे. सहा दिवस म्‍हणजे 13 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातून सुमारे साडेसहा हजार दिव्यांग तर साडेअकरा हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. एकंदरीत जगभरातील दिव्यांगांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT