Goa Live Updates 11 November 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: म्हापसा पार्किंग मारहाण प्रकरण; आणखी एकाला अटक

Goa Breaking News 11 November 2023: गोव्यातील आजच्या ताज्या घडामोडी...

Kavya Powar

म्हापसा पार्किंग मारहाण प्रकरण; आणखी एकाला अटक

शुक्रवारी म्हापसा येथे पार्किंगमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी म्हापसा पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री अविनाश लिंगनार कोलकर, वय 30 वर्षे रा पर्वरी - गोवा याला कलम 504, 354, 509, 324, 427, 506(ii) आर/डब्ल्यू 34 अन्वये अटक करण्यात आली आहे.

मासे खाण्यात गोवा अव्वल; वर्षाला तब्बल 78 किलो 'नुस्त्यांवर' एकट्या गोवेकराचा ताव

केंद्रीय मत्स्योद्योग खात्याच्या अहवालातून समोर आलंय कि गोव्यात वर्षाला प्रति व्यक्ती 78 किलो मासे खातो. या आकडेवारीवरून मासे खाण्यात गोव्याचा देशात दुसऱ्या क्रमांक लागत असल्याचे समजतंय या क्रमवारीत लक्षद्वीप बेटाचा प्रथम क्रमांक लागतो. तिथे वर्षाला प्रति व्यक्ती तब्बल 125 किलो मासळी खाल्ली जाते.

वय 75 पेक्षा जास्त! डिचोलीच्या रामनाथ यांनी फिलिपिन्समध्ये 100 व 400 मीटर धावणे स्पर्धेत पटकावली दोन पदकं

एशिया आंतरराष्ट्रीय मास्टर्स अजिंकपद ऍथलेटिक स्पर्धेमध्ये डिचोलीतील रामनाथ पुरुषोत्तम देसाई यांनी 75 वर्षांवरील वयोगटातील 100 मीटर धावणे स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. 08 ते 12 नोव्हेंबर नंबर मनीला फिलिपिन्स येथील न्यू क्लार्क सिटी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

शुक्रवारी रात्री 100 मीटर धावणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा पदक वितरण सोहळा सकाळी आवारात पार पाडला.

टोरंटोनंतर उर्वशीचा ‘ऐ दिल है ग्रे’ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छळकणार

बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री उर्वशी रौतेला स्टारर ‘ऐ दिल है ग्रे’ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. उर्वशीच्या या चित्रपटाचा नुकताच टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये प्रीमियर झाला होता. या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले असून, उर्वशीच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे.

पोर्तुगीज दडपशाहीचा तर कदंब गोव्यासाठी सुवर्णकाळ होता; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यातील पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा पुसून टाकल्या जाव्यात अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर गोव्यासाठी पोर्तुगीज राजवट दडपशाहीचा तर कदंब घराण्याचा सुवर्णकाळ होता, असे वक्तव्य केले आहे.

पोर्तुगीजांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण केल्या पण, त्यांनी बहुतांश स्वार्थी, वसाहतवादी हितसंबंधांना चालना दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

चिंबल मशिदीत अचानक बोलवली बैठक, 20 लोकांची अटकेनंतर सुटका

चिंबल येथील मशिदीत अचानक बोलवण्यात आलेल्या बैठकप्रकरणी 20 लोकांना अटक करण्यात आली. सुरक्षात्मक कारणास्तव जुने गोवा पोलिसांनी शनिवारी (दि.11) ही कारवाई केली. दरम्यान, 1 लाखाच्या जातमुचलक्यावर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंबल येथील अंजुमन तौशिद-उल-उसलमिन, सुन्नी नुराणी मशिदीत शनिवारी अचानक एक बैठक बोलवण्यात आली. जुने गोवा पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ कारवाई करत वीस लोकांना अटक केली.

सर्वांना उप-जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले असता 1 लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कळंगुट-बागा किनाऱ्यावरील अवैध मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप; कारवाईची मागणी

कळंगुट-बागा किनाऱ्यावर अवैध मसाज पार्लरद्वारे पर्यटकांची लूट अजूनही सुरूच आहे. त्यातच या पार्लरमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे संतप्त रहिवाशांनी पार्लर बंद केले.

रस्त्याच्या कडेला उभे असलेले दलाल पार्लरमध्ये क्रॉस मसाज देण्याच्या बहाण्याने ग्राहकांना खुणावत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

भाजप सरकारला अखेर माघार घ्यावी लागली; फेरीबोट शुक्लावरून आलेमावांचा टोला

भाजप सरकारची माघारी सुरू झाली आहे. जनतेच्या प्रखर विरोधाला घाबरून तसेच लोकशक्ती हीच सर्वोच्च आहे हे ओळखून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नदी परिवहन खात्याला फेरी बोट तिकीट दरवाढ मागे घेण्याच्या सूचना दिल्या. गोवा आणि गोमंतकीयांसाठी लढणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

गोव्याच्या क्रिकेटपटूंना मास्टर ब्लास्टर सचिनचे मार्गदर्शन

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन सलग दुसऱ्या वर्षी गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्या अनुषंगाने विक्रमवीर क्रिकेटपटूने शुक्रवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर उपस्थित लावली आणि गोव्याच्या रणजी, तसेच युवा वयोगटातील क्रिकेटपटूंना मौल्यवान मार्गदर्शन केले. गोव्याच्या संघासाठी तो एकप्रकारे ‘मेंटॉर’ ठरला.

उत्तराखंडमधील सात शहरांत 38व्या राष्ट्रीय स्पर्धा! यजमानपद स्वीकारले

उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्या राज्यातील एकूण सात शहरांत होणार आहे. स्पर्धेनिमित्त जागतिक दर्जाच्या साधनसुविधा निर्मितीत पर्यावरणपूरक क्रीडा व पर्यटन यांची सांगड घालण्याचे उद्दिष्ट तेथील सरकारने बाळगले आहे.

सचिन कुटुंबासह गोव्यात दाखल ; घेतला फिश थाळीचा आस्वाद

वास्को, भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबीयांसमवेत गोव्यात दाखल झाला असून शुक्रवारी वेर्णा येथे "एन्टीक मार्डोल" या तारांकित रेस्टॉरंटमध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत जेवणाचा आस्वाद घेतला.

या रेस्टॉरंटमध्ये ''एन्टीक मार्डोल'' थाळीचा आस्वाद त्यांनी घेतला. या थाळीत खेकडा डिश, सोलर झिंगा, फिश करी, राइस याचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT