कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या मालकीचे दुकान सील केले. पुढील तपास सुरू आहे.
कुळे दुधसागर धबधबा पाहण्यासाठी येणारे पर्यटक जीप गाड्या अपुऱ्या पडत आहे. तासांतास त्या ठिकाणी राहून सुद्धा परत जावे लागत आहे त्यामुळे दुधसागर टूर ऑपरेटर्स समितीने सरकारजवळ विनंती केली की,सरकारने जीप गाड्या २७० ऐवजी ३२५ कराव्यात.
श्री शांतादुर्गा कुंक्कळकरीण देवीचा प्रसिद्ध वार्षिक जत्रोत्सव ४ जानेवारी पासून सुरू होणार आहे. ५ जानेवारीला अंबरी रथ, ६ जानेवारीला फुलांचो रथ, ७ जानेवारीला विजय रथ आणि ९ जानेवारीला देवीचा महारथ निघेल.
पणजीत जुन्या मांडावी पुलावर रेंट-अ-कार आणि दुचाकींचा अपघात झाला. चुकीच्या लेनमध्ये घुसल्याने गाडीने दोन दुचाकींना धडक दिली.
गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, कुंक्कळीचे आमदार युरी आलेमाव आणि केपेचे आमदार अल्टोन डकोस्टा यांनी दिल्ली AICC मुख्यालयात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
साळगाव पोलिसांनी दिनेश कुमार (३०, हिमाचल प्रदेश) याला २.८० लाख रुपये किमतीचे ०.२८० किलो वजनाचे अंमली पदार्थ अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.