Goa Liberation Delay Dainik Gomantak
गोवा

'गोवा मुक्ती'ला विलंब नेहरूंमुळेच- मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

Goa Liberation Delay: माजी उपपंतप्रधान तथा गृहमंत्री स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४६ पासूनच ‘गोवा मुक्ती’साठी प्रयत्‍न सुरू केले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: माजी उपपंतप्रधान तथा गृहमंत्री स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४६ पासूनच ‘गोवा मुक्ती’साठी प्रयत्‍न सुरू केले होते. गोवा भारताचा अविभाज्‍य घटक आहे. त्‍यामुळे गोव्‍याला पोर्तुगिजांच्‍या जोखडातून मुक्त करणे आवश्‍‍यक असल्‍याचे सांगत भारतीय लष्कर गोव्याला केवळ दोन तासांत मुक्त करू शकतात, असेही त्‍यांनी म्‍हटले होते;

परंतु तत्‍कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या अहिंसावादी परराष्ट्र धोरणामुळे गोव्याला मुक्त होण्‍यासाठी वाट पाहावी लागली असे म्‍हणत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नेहरूंवर पुन्‍हा एकदा खापर फोडले. राष्ट्रीय ‘एकता दिना’निमित्त शनिवारी पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्‍यासह प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्‍थित होते. वल्लभभाई पटेल यांनी गोवा मुक्तीचा विषय कायम लावून धरलेला होता. १९४६ मध्‍ये त्‍यांनी तत्‍कालीन काँग्रेस अध्‍यक्षांना पत्र पाठवून गोव्‍याचा भारतात समावेश होणे महत्त्‍वाचे असल्‍याचे म्‍हटले होते. त्‍यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्‍या बैठकीतही त्‍यांनी तशी मागणी केलेली होती; परंतु पोर्तुगिजांची सत्ता असलेल्‍या गोव्‍यावर भारताने हल्ला केल्‍यास त्‍याचे परराष्‍ट्र धोरणावर परिणाम होण्‍याची भीती नेहरूंनी बाळगली. त्‍यामुळे गोवा त्‍यावेळी मुक्त होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhangar ST Status Demand: 23 वर्षांची प्रतीक्षा, आता धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 'एसटी' दर्जा न मिळाल्यास 4-5 आमदारांना पाडण्याचा दावा

Goa Politics: काँग्रेसला 'हात' की वेगळी चूल? निवडणुकीबाबत 'आरजी'च्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक

LPG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री! गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, दिवाळीपूर्वीच महागाईचा मोठा झटका

खरी कुजबुज: जो जिता वही सिकंदर!

Rohit Sharma: 2027 वर्ल्डकपसाठी 'हिटमॅन'ची खास रणनीती! विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळणार, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा गाजवणार मैदान

SCROLL FOR NEXT