Leopard in Goa Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: उसगावात मृतावस्‍थेत आढळला बिबट्याचा बछडा; घातपाताचा वनाधिकाऱ्यांना संशय

Leopard In Goa: या बिबट्याच्या चारही पायांची नखे कापून नेली आहेत.

Ganeshprasad Gogate

Leopard In Goa: उसगाव-पालवाडा येथे रस्त्याच्या बाजूला अडीच ते तीन वर्षांचा एक बिबट्याचा बछडा मृतावस्‍थेत आढळला. या बिबट्याच्या चारही पायांची नखे कापून नेली आहेत.

तसेच त्याची कातडीही काढून नेण्यासाठी अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केले असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात स्‍थानिकांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे, अज्ञात वाहनाच्‍या धडकेने बिबट्याचा मृत्‍यू झाला असावा.

परंतु नखे काढलेली असल्‍याने हा घातपाताचा प्रकार असावा, या शक्‍यतेला बळकटी मिळत आहे. वन खात्याचे अधिकारी आल्‍यानंतर अधिक उलगडा होऊ शकेल.

या परिसरात मोठ्या प्रमाणात रानटी जनावरांची शिकार होत असून वन खाते मात्र सुशेगाद आहे.

काही महिन्यांपूर्वी साखळी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. अधूनमधून साखळी आणि पंचक्रोशीत बिबट्याचा वावर दिसून येतो.

परिसरतील भटकी कुत्री अचानक गायब होत असून, सूर्ला येथे वासरावर बिबट्याने हल्ला करत त्याला जखमी केल्याची घटना घडली होती. दिवसाढवळ्या मानवीवस्तीनजीक बिबट्याचा वावर होत असल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मत चोरी'द्वारे जिंकण्याचा डाव, 1.27 लाख मतदार वगळले; सरदेसाईंचा भाजपवर आरोप

VIDEO: 'सुपरमॅन' मार्को जॅन्सनचा मैदानावर थरार! 6 फूट 8 इंचाच्या गोलंदाजाचा अद्भुत झेल, फलंदाजही शॉक; व्हिडिओ तूफान व्हायरल

Arpora Nightclub Fire: 'बर्च' पीडितांना भरपाई देण्यास लुथरा बंधू तयार; प्रस्‍ताव देणार, वकिलांनी दिली माहिती

Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

Shukraditya Rajyog 2026: 17 ऑक्टोबरपासून सोन्याचे दिवस सुरु! शुक्रादित्य राजयोग बदलणार 4 भाग्यशाली राशींचे आयुष्य; सुख, समृद्धी आणि संपत्तीची होणार बरसात

SCROLL FOR NEXT