Leopard In Goa Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: काणकोणात बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला: मानवी वस्तीकडचा जंगली श्वापदांचा वावर वाढला

Leopard In Goa: वाघांना जंगलात परत आणण्यासाठी वन क्षेत्रात सांबरांची संख्या वाढवणे यासारख्या उपाययोजना जॉनसिंग यांनी सुचवल्या आहेत.

Ganeshprasad Gogate

Leopard In Goa: जंगली श्वापदांचा मानवी वस्तीकडे वावर वाढत चालला असून काल शनिवारी रात्रौच्या सुमारास काणकोण खोतीगाव येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेत कुत्रा घायाळ झाला असून त्याच्या गळ्याला बिबट्याने चावा घेतलाय. सदरच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

राज्यातील वन क्षेत्राची घटत जाणारी सीमा, जंगलातील अपुरा पाणी साठा तसेच भक्ष्य न मिळणे या आणि अशा अनेक कारणांसाठी जंगली प्राणी मानवी वस्तीकडे फिरू लागले आहेत.

वन्यजीव तज्ञांनी बिबट्या आणि वाघांच्या पशुधनावरील हल्ल्यांना रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही महिन्यात सत्तरी आणि धारबांदोडा येथील म्हादई खोऱ्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिकार उपलब्ध नसल्याने अशा घटनामध्ये वाढ होत असल्याचे वन्यजीव तज्ञांनी म्हटले आहे.

वन्यजीव जीवशास्त्रज्ञ ए जे टी जॉनसिंग यांनी राज्याच्या वन विभागाला एक अहवाल सादर केला. वाघांना जंगलात परत आणण्यासाठी वन क्षेत्रात सांबरांची संख्या वाढवणे यासारख्या उपाययोजना जॉनसिंग यांनी सुचवल्या आहेत.

या दिशेने कोणतेही प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत, त्यामुळे बिबट्या आणि वाघ पाळीव प्राण्यांवर हल्ले करताहेत. असे जॉनसिंग यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गोव्यावर निवडणूक निकालाचा परिणाम होणार?

Louis Berger Bribery Scam: लुईस बर्जर घोटाळा प्रकरणात कामत, चर्चिल यांना दिलासा; 'पीएमएलए'चा तो आदेश हायकोर्टाकडून रद्द

बंगालमध्ये सत्तापालट! 'मिनी इंडिया'ने का नाकारली दीदींची साथ? भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवाची 5 मोठी कारणं

IPL Breaking धोनीने घेतला मोठा निर्णय! दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी 'यलो आर्मी'ला मोठा झटका; चाहत्यांमध्ये नाराजी

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! विद्यार्थिनीवर अत्याचार करून खाजगी फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; शिक्षकाला 11 वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT