Goa Legislative Forum meeting Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : 'म्हादई'साठीच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी फिरवली पाठ

विधिमंडळ फोरमच्या वतीने चर्चेचे आयोजन, माजी लोकप्रतिनिधी आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute : विधानसभेतील एकदिवसीय चर्चेनंतर म्हादई विषयावर राज्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींसह चर्चा व्हावी, असा निर्णय विधिमंडळ फोरमने घेतला होता. त्यानुसार आज चर्चा ठरली होती.

मात्र या चर्चेत विद्यमान 90 टक्के आमदारांसह मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. सरकारने या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, अशी सूचना करणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला. यावेळी माजी लोकप्रतिनिधी आक्रमक दिसून आले.

जल आयोगाने कर्नाटकाच्या कळसा भांडुरा सुधारित प्रकल्प आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर कर्नाटकाने हे काम तातडीने सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड जनक्षोभ उसळलेला असताना या विषयावर जनजागृती आणि सविस्तर चर्चा व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

म्हादई विषयावर सेव्ह म्हादई या चळवळीने विर्डी साखळी येथे जाहीर सभा घेतली. या दरम्यान विधानसभेतही एकदिवसीय पूर्णवेळ चर्चा झाली. याच विषयावर विद्यमान सरकार आणि माजी लोकप्रतिनिधींची भूमिका काय आहे? यांची एकत्रित चर्चा व्हावी, यासाठी विधिमंडळ फोरमने आज विधानसभेत चर्चा घडवून आणली.

सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुवा डिसोझा हे फोरमचे कार्यकारणी सदस्य वगळता केवळ प्रेमेन्द्र शेट हे विद्यमान आमदार यावेळी हजर होते. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, विरोधी पक्षनेते, विद्यमान आमदारांनी या चर्चेकडे पाठ फिरवली.

त्यामुळे एकूणच सत्ताधारी सरकार या विषयावर गंभीर नाही, अशी बोचरी टीका माजी आमदार नरेश सावळ आणि दयानंद मांद्रेकर यांनी केली.

सरकारने पाठपुरावा करावा

आज झालेल्या चर्चेत माजी आमदार आणि खासदारांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. यात बहुतांश लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. एकूणच सरकार याबाबत गंभीर नाही, सरकारने यापुढे या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, असा सूचनावजा ठराव यावेळी संमत करण्यात आला

म्हादईच्या लढाईमध्ये सातत्याने दिरंगाई होत आहे. सरकारने आता तरी गांभीर्याने हा विषय पुढे नेणे गरजेचे असून न्यायालयाने पाठपुरावा महत्त्वाचा आहे आणि जनतेमध्ये जनजागृती गरजेची आहे. कळसा -भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची जाणीव प्रकर्षाने न्यायालयात मांडणे गरजेचे आहे.

- निर्मला सावंत, सदस्य, म्हादई बचाव आंदोलन, माजी आमदार

कर्नाटकाची भूमिका दुर्योधनासारखी!
विधिमंडळ फोरमच्या चर्चेत आज माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी म्हादईच्या संदर्भात कर्नाटककडून होत असलेल्या कारवायांवर चौफेर टीका करत कर्नाटक दुर्योधनासाठी वागत आहे, असे म्हटले.

ज्याप्रमाणे महाभारतात धर्मराजासाठी सुईच्या टोकाएवढीही जमीन देणार नाही, असे म्हणणारा दुर्योधन आणि कर्नाटक एकसारखेच भूमिका बजावत आहेत, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT