सचित बोरकर खून प्रकरणी लक्ष्मण चव्हाणला अटक
सचित बोरकर खून प्रकरणी लक्ष्मण चव्हाणला अटक  Dainik Gomantak
गोवा

Goa: सचित बोरकर खून प्रकरणी लक्ष्मण चव्हाणला अटक

दैनिक गोमन्तक

सासष्टी: क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात जखमी झालेला सचित बोरकर याचे गोवा मेडिकल महाविद्यालय इस्पितळात (Goa Medical College) उपाचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी काल रात्री मडगाव पोलिसांनी (Police) त्वरित कारवाई करुन संशयित लक्ष्मण ऊर्फ पिका चव्हाण (40) याला अटक केली. मडगाव पोलिसांनी भादंसंच्या 302 (खून करणे) या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. ही घटना रविवारी मडगाव स्टेशन रोड परिसरात घडली होती.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचित बोरकर हा मडगावमधील रहिवासी असून त्याचा रेल्वे स्थानक परिसरात गाडा आहे. संशयीत लक्ष्मण हे पेशाने मोटर सायकल पायलट आहेत. रविवारी रात्री उशिरा क्षुल्लक कारणावरून लक्ष्मण आणि सचित यांच्यात भांडण झाले. लक्ष्मण याने सचितला मारहाण केली व त्याच्या डोक्यावर प्लास्टिक खुर्ची मारल्याने तो खाली पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला सर्वप्रथम त्याला हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले. पण, नंतर त्याची तब्येत खालावत गेल्याने त्याला गोमेकॉत दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सुरज विर्डीकर याने मडगाव पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंद केली. मडगाव पोलिसांनी हा स्वंयअपघात असल्याचे समजून हे प्रकरण अनैसर्गिक म़त्यू म्हणून नोंद केले होते. पण, नंतर सोमवारी रात्री सचितच्या कुटुंबीयांनी घातपात झाल्याचा दावा करुन याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करावा व मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करुन संशयित लक्ष्मण चव्हाण याला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी भादंसंच्या 302 कलमाखाली गुन्हा नोंद केला. मडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर पुढील तपास करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

Sanjana Sawant Death Case: संजना सावंत मृत्यूप्रकरणी सात दिवसात आरोपपत्र दाखल करा, अन्यथा...

Goa Crime: राज्यात चोर, हल्लेखोरांचा सुळसुळाट, कायदा-सुव्यवस्था ढासळली! काँग्रेसचा घणाघात

SCROLL FOR NEXT