Laser Run City Tour Competition Dainik Gomantak
गोवा

Laser Run City Tour Competition: बाबू, शिवनाथ, युग भारतीय संघात

Laser Run City Tour Competition नेपाळमधील मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील गोव्याचे पदकविजेते खेळाडू

किशोर पेटकर

Laser Run City Tour Competition नेपाळमध्ये होणाऱ्या मॉडर्न पेंटॅथलॉनमधील ग्लोबल लेझर रन सिटी टूर स्पर्धेसाठी भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाने गोव्याच्या बाबू गावकर, शिवनाथ माजीक व युग दळवी यांची निवड केली आहे. स्पर्धा 25 व 26 नोव्हेंबरला होईल.

गोव्यात झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमानांनी मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये यशस्वी कामगिरी बजावताना 1 सुवर्ण, 1 रौप्य व 6 ब्राँझ अशी एकूण 8 पदके जिंकली होती. स्पर्धेत गोव्याचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान बाबू गावकर याने मिळविला होता.

त्याने पुरुषांच्या लेझर रनमध्ये अव्वल कामगिरी नोंदविली. शिवाय त्याने मिश्र लेझर रनमध्ये रौप्यपदकही पटकावले होते. युग दळवी याने दोन ब्राँझपदकांची, तर शिवनाथ माजीक याने एका ब्राँझपदकाची कमाई केली होती.

गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेचे अध्यक्ष संजीव गडकर, भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाच्या अध्यक्ष संध्या पालयेकर, प्रशिक्षक कीर्तन वैझ, सावियो लैताव, वीरेंद्र माजीक यांनी बाबू, शिवनाथ व युग यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

FC Goa: एफसी गोवाचा अखेर विजय! फॉर्टिस एफसीला 2-1 ने नमवत एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये गुणांचे खाते उघडले

Goa Ranji Trophy: कसवणकर-सुयशची मेहनत वाया; गोव्याला उत्तर प्रदेशने 68 धावांनी हरविले, पराभवाची मालिका कायम

Cancer Survival AI: एआयचा चमत्कार! आता चेहरा सांगणार कॅन्सर रुग्णाचे भविष्य, नव्या संशोधनाने खळबळ; 40,000,000 हून अधिक फोटोंचा अभ्यास

SCROLL FOR NEXT