Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: तीन नवीन रेल्वे स्टेशन, इतक्या कोटींची गुंतवणूक! गोव्यात विकासाची गाडी सुस्साट; रेल्वेमंत्र्यांची घोषणा

Goa Konkan Railway Budget: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी (३ फेब्रुवारी) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी गोव्याला ४८२ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केलीय.

Sameer Amunekar

Goa Konkan Railway Budget

मडगाव: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी (३ फेब्रुवारी) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी गोव्याला ४८२ कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केलीय. ही तरतूद दक्षिण पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या विकासकामांसाठी आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत ही घोषणा केलीय. अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटकला ७,५६४ कोटी रुपये, तामिळनाडूला ६,६२६ कोटी रुपये आणि केरळला ३,०४२ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.

गोव्यात एकूण गुंतवणूक ट्रॅक दुहेरीकरण, विद्युतीकरण, ट्रॅक नूतनीकरण, स्टेशन पुनर्विकास कामं इत्यादी पूर्ण झालेल्या आणि चालू असलेल्या प्रकल्पांवर ५,६९६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत," अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं (Konkan Railway Corporation Limited) धोरणात्मक विकास प्रकल्पांद्वारे आपलं नेटवर्क विस्तारण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत.

केआरसीएलचे व्यवसाय विकास कार्यकारी संचालक जोसेफ जॉर्ज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, गोव्यासाठी एक व्यापक गुंतवणूक धोरण अधोरेखित करण्यात आलंय. ज्यामध्ये नवीन स्थानकं विकसित करणं, अतिरिक्त ट्रॅक आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि विद्यमान सुविधा वाढवणं समाविष्ट आहे.

नवीन स्थानकं बनणार

कोकण रेल्वेनं पुनर्विकासासाठी मडगाव स्थानकाची निवड आधीच केली आहे. जोसेफ जॉर्ज म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाशी सल्लामसलत करून संकल्पनात्मक योजना अंतिम केल्या जात आहेत. ज्यामध्ये शहराच्या आणि रेल्वेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

विकास धोरणात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी गोव्यात सारझोरा, नेवरा आणि मये या ठिकाणी नवीन स्थानकं तयार करणं समाविष्ट आहे. भविष्यात कोकण रेल्वेच्या ट्रॅक दुहेरीकरणासाठी, संभाव्य बोगदे आणि पुलांच्या पुनर्बांधणीसाठी जागा आधीच उपलब्ध करून ठेवण्यात आलीय. त्यामुळं जागेच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT