Goa Khandola College Dainik Gomantak
गोवा

Goa Khandola College: खांडोळा महाविद्यालयाचा जपानी विद्यापीठाशी करार! संशोधनाला मिळणार चालना; वैज्ञानिक साहित्यांची होणार देवाण-घेवाण

Goa Khandola College: खांडोळा महाविद्यालयात ‘ग्रीन एनर्जी: पॉवरिंग अ सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पडली.

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळा महाविद्यालयात ‘ग्रीन एनर्जी: पॉवरिंग अ सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पडली. उद्‌घाटन समारंभाला डॉ. भानू मंजुनाथ, प्रा. एस. जी. तिळवी, डॉ. अशिना किकुची यांची उपस्थिती होती. या परिषदेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेत शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, खांडोळा आणि इबराकी विद्यापीठ, जपान यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. दोन संस्थांमध्ये संशोधनाला चालना देण्यात येणार असून दोन्ही संस्थांमध्ये वैज्ञानिक साहित्यची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.

प्रा. एस. जी. तिळवी यांचा संशोधन क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. पूर्णकला सामंत यांनी स्वागत केले. डॉ. प्राजक्ता परब यांनी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजन करण्यामागचा हेतू सांगितला. डॉ. मंजुनाथ यांनी शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण धोरणे विकसित करण्याच्या महत्त्वावर भर दिला. डॉ. अशिना किकुची यांनी संस्थांमधील वैज्ञानिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य कराराच्या संभाव्यतेवर माहिती दिली. इबराकी विद्यापीठातील प्रा. के. तनाका यांनी कार्बन रिसायकलिंग धोरणांवर चर्चा केली. प्रा. सकायदा यांनी उर्जेचा वापर कमी करण्यासाठी थेट हवेच्या धोरणांवर लक्ष केंद्रित केले.दुसऱ्या सत्रादरम्यान भारतातील २२ संशोधकांनी त्यांचे संशोधनात्मक निष्कर्ष मांडले.

पोस्टर सादरीकरण

पोस्टर सादरीकरणात महिमा एस (रेवा युनिव्हर्सिटी बेंगलोर), श्रेष्ठा सक्सेना (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. तिसरा क्रमांक पूजा नाईक (इबराकी विद्यापीठ, जपान), अजिंक्य कृष्णात्रय (एनसीएल, पुणे) यांनी मिळवला. पोस्टर प्रेझेंटेशनसाठी फिरदोस साकली (खाडोळा महाविद्यालय), डॉ. मीरा परमेकर (सेंट झेवियर कॉलेज, म्हापसा) यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले. तिसरे स्थान डॉ. डिलेक्टा डिकोस्टा (खांडोळा महाविद्यालय) आणि निकित्रा गुप्ता (सीएसआयआर-एनसीएल) पुणे यांना प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT