Mhadei Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mhadei Water Dispute: "म्हादईबाबत सरकारचे अपुरे प्रयत्न" केरकरांनी व्यक्त केली खंत; कर्नाटकला टक्कर देताना गांभीर्याने विचार करण्याची गरज

Rajendra Kerkar on Mhadei Issue: समितीने कणकुंबीला प्रत्यक्ष भेट देऊन घडामोडी समजून घेतल्या पाहिजे अशी मागणी केरकरांनी केली आहे

Akshata Chhatre

डिचोली: गोवा राज्य सरकारने म्हादई प्रकरणी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या वारंवार पंतप्रधान आणि नेत्यांची भेट घेऊन या प्रकरणात दबाव बनवण्याचा प्रयत्न करतायत मात्र गोवा सरकारकडून अजूनही गांभीर्याने विचार केला जात नसल्याची खंत गोव्यातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, लेखक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली.

बुधवार (दि. ८ जानेवारी) रोजी राज्य सरकारने स्थापन केलेल्या म्हादई समितीची बैठक होणार आहे आणि या समितीने कणकुंबीला प्रत्यक्ष भेट देऊन लक्ष देऊन घडामोडी समजून घेतल्या पाहिजे अशी मागणी केरकरांनी केली आहे.

अद्याप गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी म्हादई प्रकरणी सादर केलेली याचिका सर्वोच्य न्यायालयाकडून येणाऱ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. गोवा सरकारकडून कायदेशीर सल्ल्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा परिणाम समोर येत नाही आहेत.

तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक सरकार मात्र व्याघ्र मार्गाचा दाखला मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. शेजारी राज्याने कळसाचे पाणी वळवले असून देखील राज्य सरकार अजून याला तोंड देण्यासाठी पुरेसे प्रयत्न करताना दिसत नसल्याचं केरकरांनी म्हटलंय.

पर्यटवरण प्रेमी आणि गोव्यातील लेखक, अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या मते सरकारने म्हादईचा प्रश्न गंभीरतेने हाताळण्याची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रदेशाला भेट देऊन प्रत्यक्षपणे समस्या जाणून घेतली पाहिजे.

राज्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केवळ एकदा संबंधित बैठक घेतली आणि आज कैक दिवसांनंतर विजय सरदेसाई यांनी लिहिलेल्या पत्रामुळे दुसरी बैठक होणार असल्याचं केरकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT