Mhadai River: 'म्हादई आपल्याला आईपेक्षा जास्त' म्हणणाऱ्यापेक्षा तसा वागणारा मुख्यमंत्री गोव्याला लाभो; बैठक पुढे ढकलल्याने सरदेसाई संतप्त

Mhadei Water Dispute: सभागृह समितीची बैठक २७ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आधी देण्यात आली होती. ती पुढे ढकलली गेल्याचे समजताच सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला.

Mhadei River Water Dispute Goa Government Meeting

पणजी: म्हादई नदीचे पाणी कर्नाटक पळवण्याचा प्रयत्न करत असताना आता १० जानेवारी रोजी ११ वाजता विधानसभेच्या सभागृह समितीची बैठक बोलावण्यात आली होती. ८ फेब्रुवारीनंतर या समितीची बैठकच न झाल्याने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी या समितीची बैठक घेण्याची मागणी केली होती.

सभागृह समितीची बैठक २७ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आधी देण्यात आली होती. ती पुढे ढकलली गेल्याचे समजताच सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला. म्हादई ही आपल्याला आईपेक्षा जास्त असे केवळ म्हणणाऱ्यापेक्षा तसा वागणारा मुख्यमंत्री गोव्याला लाभो आणि सभागृह समितीचे नेतृत्व त्याने करो, अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.

बैठकीसाठी सरदेसाईंचा आग्रह

गोव्याच्या अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांनी म्हादईच्या संरक्षणासाठी आवाज उठवला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हादईसाठी तातडीची समिती बैठक बोलवण्याचा आग्रह धरला. सभागृह समितीची आगामी बैठक गोव्याच्या हक्कांसाठी पुढील धोरणे आखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत म्हादईचा प्रश्न आंतरराज्य विवादांपासून गोव्याच्या भविष्यासाठी कशा प्रकारे सोडवता येईल, यावर विचारविनिमय होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com