Tamnar Power Line Project: गोव्यात अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी 2015 मध्ये उर्जा मंत्रालयाने गोव्यासाठी गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट सुरु केला असून या पॉवर लाईन प्रकल्पाचे आता फक्त 20% काम पूर्ण व्हायचे बाकी असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय.
गेली दीड वर्ष हा प्रकल्प रखडला असून या प्रकल्पासाठी जी वृक्षतोड करण्यात आली त्याविरुद्ध SC मध्ये केस दाखल करण्यात आली होती.
हा प्रकल्प गोवा, कर्नाटक आणि छत्तीसगड राज्यात विस्तारलेला असून गोवा आणि कर्नाटकच्या पश्चिम घाटातील घनदाट जंगलातून 400KV DC क्वाड ट्रान्समिशन लाइन जाणार आहेत. या प्रकल्पासाठी जी वृक्षतोड होणार होती त्यासाठी बराच गदारोळ माजला होता. मात्र प्रकल्पासाठी कापलेल्या झाडांच्या बदल्यात पुन्हा वृक्ष रोपण होणार असल्याची माहितीही सरकारने दिली आहे.
दरम्यान या प्रकल्पामध्ये ज्या ठिकाणी टॉवर जिथे आहेत तिथेच झाडे तोडली जातील आणि पॉवर केबल्स बांधल्या जातील. असेही या प्रकल्पातील एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. हा प्रकल्प उत्तर आणि दक्षिण गोव्यात वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असून या प्रकल्पाद्वारे दक्षिणेकडून येणारी वीजही वाढणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.