Goa Kala Academy Meeting|CM Pramod Sawant|Kala Rakhon Maand  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: '७० कोटी' खर्च तरीही तांत्रिक काम दर्जाहीन! कला अकादमी सुसज्ज करण्यासाठी आता समिती ठेवणार लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Kala Academy Problems

पणजी: कला अकादमीच्या आतापर्यंत झालेल्या दुरुस्तीच्या कामांची चौकशी व अभ्यास करण्यासाठी विविध खात्यातील अधिकाऱ्यांसह कला राखण मांडच्या सदस्यांच्या समावेशासह समिती नेमण्याचे तसेच कंत्राटदारांकडूनच सर्व कामे पूर्ण करून घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री यांनी दिल्याची माहिती कला राखण मांडचे संयोजक देविदास आमोणकर यांनी दिली.

कला राखण मांडच्या (Kala Rakhon Maand) सदस्यांनी गेल्या अडीच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवारी वेळ दिली होती. भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात आमोणकर यांच्यासह दिलीप प्रभुदेसाई, सिसील रॉड्रिग्स, फ्रान्सिस कुएल्हो व इतरांचा समावेश होता. याशिवाय सार्वजनिक बांधकाम खाते, कला अकादमी, गोवा पायाभूत साधन सुविधा विकास महामंडळ, कला आणि संस्कृती खात्याचे अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

मंत्रालयात झालेल्या या भेटीविषयी आमोणकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांकडे कला राखण मांडचे म्हणणे मांडण्यात आले. कला अकादमीविषयी ज्या बाबी निदर्शनास आल्या, त्याची सविस्तर माहिती देण्यात आली. नूतनीकरण करताना ज्या चुका घडलेल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कला अकादमीच्या नूतनीकरण कामाविषयी अत्यंत काळजी घेणे गरजेचे होते. परंतु ते काम संबंधित यंत्रणेकडून झालेले नाही. तांत्रिक चुका तर घडलेल्या आहेत त्याशिवाय कामाच्या विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे या कामाची श्‍वेतपत्रिका काढणे आवश्‍यक असल्याचे सदस्यांनी सांगितले.

आतापर्यंत ७० कोटी खर्च

आतापर्यंत या कामावर ७० कोटी रुपये खर्च झाले आहेत, आता त्यावर एकही पैसा खर्च होणार नाही. कंत्राटदाराची बिले स्थगित ठेवण्यात आली आहेत व चांगले काम झाले नसेल तर कंत्राटदाराकडून पुन्हा करून घेतले जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले. दरम्यान, रवींद्र भवन, राजीव कला मंदिरावर लक्ष ठेवण्यासाठी त्या-त्या तालुक्यातील कलाकारांची समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे उपस्थितांनी सांगितले.

समिती नेमण्याचे विचाराधीन

कला अकादमीच्या कामाचा अभ्यास व असणाऱ्या त्रूटी समजून घेण्यासाठी लवकरच समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीत कलाकार, सरकारी अधिकार आणि तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश असेल. ही समिती सरकारबाहेरील व्यक्तीच्या आधिपत्याखाली असावी, ती समिती निष्पक्ष काम करेल. त्याचबरोबर ती महिन्याभरात निरीक्षण करून आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर अकादमीच्या सर्व बाबी करून घेतल्या जातील, असे सदस्यांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर विचार करू असे आश्‍वासन दिले.

तांत्रिक काम दर्जाहीन !

कला अकादमीच्या नूतनीकरणाअंतर्गत तांत्रिक काम करण्यात आले आहे, ते दर्जाहीन झाले आहे. या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य कमी दर्जाचे असून त्याचा परिणाम त्वरित जाणवला आहे. इफ्फीसाठी २००४ मध्ये काम करताना अनेक चुका घडल्याचे कला व संस्कृती खात्याच्या मंत्र्यांचे म्हणणे असेल तर त्याची चौकशी होणे आवश्‍यक आहे आणि त्याचा चौकशी अहवाल पुढे यावा. त्यावेळीच्या चुका दुरुस्त न करता तसेच काम रेटण्यात आल्याने अकादमीचे पूर्वीचे वैभव हरवले आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे, असे सिसील यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT