Kala Academy: भ्रष्टाचार लपवण्याचा भाजपचा प्रयत्न, नुतनीकरण कामाची श्वेतपत्रिका काढा; युरी आलेमावांची मागणी

Kala Academy: कोट्यवधी रुपयांच्या लुटीचा तपास करण्याऐवजी सरकार अधिकच पैसा मिळवण्यात व्यस्त आहे; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव.
Kala Academy: भ्रष्टाचार लपवण्याचा भाजपचा प्रयत्न, नुतनीकरण कामाची श्वेतपत्रिका काढा; युरी आलेमावांची मागणी
Yuri Aleamo On Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला अकादमीच्या मुद्द्यावर कला राखण मांड-गोवा या मंचाला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शुक्रवारी सांगितले की सरकारने निकृष्ट आणि डुप्लिकेट उपकरणे बदलण्यासाठी अतिरिक्त निधी खर्च करू नये.

कला अकादमीच्या नुतनीकरण प्रक्रियेबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणारे निवेदन कला राखण मांड यांनी गुरुवारी मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केले.

युरी आलेमाव यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी करदात्यांच्या पैशाचा वापर केला जात असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्वेतपत्रिका काढणे आवश्यक आहे.

'कला अकादमीच्या कामात झालेला भ्रष्टाचार लपवण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असला तरी ही लूट कोणाच्या खिशात गेली हे सर्वांना माहीत आहे. कोट्यवधी रुपयांच्या लुटीचा तपास करण्याऐवजी सरकार अधिकच पैसा मिळवण्यात व्यस्त आहे. या मुद्द्यावर माझा कला राखण मांड यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि या भ्रष्ट सरकारचा आम्ही पर्दाफाश करू,' असे आलेमाव म्हणाले.

Kala Academy: भ्रष्टाचार लपवण्याचा भाजपचा प्रयत्न, नुतनीकरण कामाची श्वेतपत्रिका काढा; युरी आलेमावांची मागणी
कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदलासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पाच महत्वाच्या योजना आणि तरतुदी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी व सुचना मिळवण्यासाठी कलाकारांसह तातडीने एक समिती गठित करावी, असे आलेमाव म्हणाले.

'प्रमोद सावंत यांनी या मंचच्या मागण्या पूर्ण कराव्यात. जर ते अयशस्वी झाले, तर न्याय मिळवण्यासाठी ते जे काही पाऊल उचलेल त्यात काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देईल,' असे आलेमाव म्हणाले.

सरकारने कला अकादमीला दिलेला निधी आधीच लुटला आहे, आता त्यांना आणखी लूट हवी आहे, असा आरोप आलेमाव यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com