Goa Kala Academy कला अकादमी सार्वजनिक बांधकाम खाते जेव्हा हस्तांतरित करेल, त्यानंतरच ती खुली होईल. त्याविषयी निश्चित तारीख सांगण्याकडे दुर्लक्ष करीत कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली. दरम्यान ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील अशी माहिती गावडे यांनी दिली.
पावसाळी अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी कला व संस्कृती खाते, ग्रामीण विकास खाते, क्रीडा क्षेत्र अशा अनुषंगाने मागण्या आणि कपात सूचनांवर गावडे यांनी सायंकाळी उत्तरे सादर केली.
दरम्यान, वाचनालयावर गावडे म्हणाले, ज्ञानासाठी वाचनालये महत्त्वाची आहेत. यावर्षी वाचन परंपरा रुजविण्यासाठी नऊ वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. बिगरसरकारी वाचनालयांचे व स्थानिक पातळीवरील वाचनालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.
फोंडा येथे नव्या वास्तू उभारण्याचा विचार आहे. कुडचडे येथे नवी वाचनालय इमारत उभारणी सुरू आहे. वास्कोतही वाचनालयाची नवी इमारत उभारली जाणार आहे. स्पर्धात्मक युगाचा विचार करता वाचनालय अद्ययावतीकरण करणे महत्त्वाचे आहे.
आशियातील पहिल्या वाचलनालय धोरणाची या महिन्याअखेरपर्यंत अंमलबजावणी केली जाणार आहे. डॉ. नंदकुमार कामत यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण ग्रामीण भागापर्यंत नेण्याचे काम होणार आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ग्रामीण कौशल्य योजनेसाठी अजून गोव्यासाठी एजन्सी नियुक्त झालेली नाही. राज्य ग्रामीण विकास हा विभाग केंद्र सरकारच्या निधीवर अवलंबून आहे.
कायमस्वरूपी कर्मचारी या विभागात नाही, तरीही त्यांना राज्य सरकार ज्या सुविधा देता येईल तेवढ्या देत आहे. दिल्ली हट या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे.
कलाकारांसाठी पुरस्कार
कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कार, शिष्यवृत्ती दिल्या जातात. नवोदित कलाकार संचालनालयाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. या खात्यांतर्गत करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध आहोत.
आमदार विजय सरदेसाई यांनी केलेल्या सूचना आपण नोंदवून घेतलेल्या आहेत, असेही मंत्री गोविंद गावडे यांनी नमूद केले.
लोकोत्सव निधी 5 वरून 10 लाख
सांगोड आणि बोनेरा यांना कला व संस्कृती खात्यातर्फे मदत केलेली आहे. या कार्यक्रमांना मदत वाढविण्याचा विचार केला जाईल, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
त्याशिवाय काणकोणातील लोकोत्सवास कला अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या ५ लाख रुपये निधीत वाढ करून तो दहा लाख द्यावा, अशी सभापतींनी केलेली सूचना मंत्री गावडे यांनी मान्य केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.