Panjim Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Kadamba Strike: आमचं जगणं कठीण झालयं! मागण्यांवरुन कदंबा कर्मचारी नेते फाॅन्सेकांचे उपोषण; 19 तारखेला संपाची नोटीस

Kadamba Transport Strike: संपाचा भाग म्हणून आज मध्यरात्री पासून मी एक दिवसीय उपोषणासाठी श्रमशक्ती भवना समोर बसणार

Akshata Chhatre

पणजी: सरकारने मागण्यांची दाखल घ्यावी आणि त्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून कदंबा कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.१०) रोजी कदंबा बसस्टॅन्ड पणजी येथे आंदोलन सुरु केले आहे. "आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १९ तारखेला संप करण्याची नोटीस आम्ही कदंबा खात्याला दिली आहे आणि त्याच संपाचा भाग म्हणून आज मध्यरात्री पासून मी एक दिवसीय उपोषणासाठी श्रमशक्ती भवना समोर बसणार" असं कामगार नेते कॉम्रेड क्रिस्तोफर फोन्सेका म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांनी हमी भरून देखील पैसे पोहोचलेले नाही

गेल्या काही दिवसांपासून कदंबा कामगाराच्या मागण्या प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा याबाबतची फाईल या खात्यातून त्या खात्यात फिरत आहे. यामुळे सरकारने या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कण्याची मागणी AITCU ने केली आहे.

कदंबा कामगारांच्या वतीने बोलताना सोमवारी कामगार नेते कॉम्रेड क्रिस्तोफर फोन्सेका यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मागण्या मांडल्या. प्रोविडेंट फंडच्या अंतर्गत मिळणार हिस्सा किमान निवृत्त कामगारांना मिळावा, सेवेत रुजू असलेल्या कामगारांना हा हिस्सा तीन हप्त्यांमध्ये दिल्याने काहीही हरकत घेतली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी हमी भरून देखील पैसे कामगारांपर्यंत पोहोचलेले नाही म्हणून संपावर जाण्याचा इशारा कॉम्रेड क्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिलाय.

दीड-दोन हजार रुपयांच्या किमतींमध्ये जगणं कठीण

आजच्या महागाईत टिकाव धरण्यासाठी हाती येणारी पेन्शन पुरेशी नसते. दीड-दोन हजार रुपयांच्या किमतींमध्ये जगणं कठीण आहे, त्यामुळे सरकारने कदंबाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढवून द्यावी, कदंबा कामगारांसाठी सातवे वेतन लागू करावे अशी मागणी कर्मचारी करतायत.

माझी बस स्कीम कामगारांना नकोय, ही कामगार विरोधी आणि लोकांच्या विरोधात जाणारी योजना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून मजुरीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्थायी नोकरी देण्याची मागणी केली आहे. राज्यातील ट्राफिक कंट्रोलरच्या पदांमध्ये वाढ करवा, बढती द्या आणि इलेक्ट्रिक कदंबा बसमध्ये केवळ कदंबाचेच कामगार असले पाहिजेत असं ते म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT