Goa Road Issue | Kadamba Highway Daini Gomantak
गोवा

Goa Road Issue: कदंब पठारावरील रस्‍ता 'ब्लॅक स्पॉट' म्हणून घोषित!

Goa Road Issue: गोव्यात अपघात घडत असलेल्या ठिकाणांची नोंद करत अपघातप्रवण क्षेत्र आणि ब्लॅक स्पॉट अशा दोन गटांत त्यांची विभागाणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Road Issue: पणजी ते जुने गोवे महामार्गावरील कदंब पठार येथील श्री साईबाबा मंदिराच्या आवारातील रस्ता हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा महामार्ग सहापदरी असल्याने मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने हाकणे व ‘रोड लेन’चा वापर न करणे यामुळे 500 मीटरच्या क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत दहा भीषण अपघात घडले आहेत.

दरम्यान, त्यामुळे या ठिकाणी वेग नोंद कॅमेरा स्पीड गन (Speed Gun) हा पर्याय आहे. या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे, मात्र रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी त्याचा वापर करत नसल्याने हे ठिकाणा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरले आहे.

राज्यात गेल्या तीन वर्षांत घडलेल्या अपघातांचा वाहतूक पोलिसांनी अलीकडेच आढावा घेऊन काही ठराविक भागातच वारंवार अपघात घडत असलेल्या ठिकाणांची नोंद करत अपघातप्रवण क्षेत्र व ब्लॅक स्पॉट अशा दोन गटांत त्यांची विभागाणी केली. या अहवालानुसार सुमारे 39 अपघाप्रवण क्षेत्रे व ब्लॅक स्पॉट निवडले आहेत.

त्यामध्ये कदंब पठार येथील रस्त्याचा समावेश ब्लॅक स्पॉटमध्ये करण्यात आला आहे. हा महामार्ग असल्याने रस्त्याच्या बाजूने वेगमर्यादा फलक असूनही वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. जवळपास 80 ते 100 किलोमीटर वेगाने वाहने चालविली जातात. विशेष म्‍हणजे ही वाहने एकाच रोड लेनमधून चालविली जात नाही तर ओव्हरटेक करताना रस्त्याची दुसरी लेन बदलली जाते व अपघात घडतात.

धोकादायक वळणे व अती घाई

अलीकडे कदंब पठारावरील लोकवस्ती वाढली आहे. मोठमोठे गृह संकुल तसेच व्यावसायिक शोरूमही झाल्याने काहीजण भरधाव वेगाने रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना चुकवून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. सर्व्हिस रस्ते असूनही त्याचा वापर केला जात नाही.

ब्लॅक स्पॉट म्‍हणजे नेमके काय?

ज्या रस्त्यावर 500 मीटर अंतराच्या क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत पाच किंवा त्यापेक्षा अधिक भीषण अपघात घडले आहेत आणि त्यात किमान दहाजणांचा मृत्यू झाला आहे, अशा ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्‍यात आले आहे.

अपघात प्रवणक्षेत्र: रस्त्याच्या चुकीच्या अभियांत्रिकीकरणामुळे 500 मीटर अंतरावरील क्षेत्रात वारंवार अपघात घडतात. तेथे झालेले अपघात भीषण व गंभीर होऊन मृत्यू झाले आहेत आदी निकष लावून ही ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून रस्तेअपघात व कारणे यासंदर्भात महामार्ग योजना: 2021 च्या योजनेत केलेल्या दुरुस्तीनुसार जाहीर करण्यात आलेली आहेत.

वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे: कदंब पठारावरी श्री साईबाबा मंदिरानजीकचा रस्ता रुंद आहे, मात्र तेथे असलेल्या वळणामुळे अनेक चालकांचे वाहनांवरील नियंत्रण जाऊन वारंवार अपघात घडत आले आहेत. भरधाव दुचाकी चालकांचे नियंत्रण जाऊन स्वयंअपघात तर रस्त्यावर बसलेल्या गुरांमध्ये मालवाहू अवजड वाहनांना अपघात झाला आहे.

गेल्या तीन वर्षांत दहा भीषण अपघातामुळे हा रस्ता 'ब्लॅक स्पॉट' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर रस्त्यावर गतिरोधक घालणे कायद्यानुसार शक्य नसल्याने चिंबल जंक्शननंतर पुढे धोकादायक वळण आहे याची पूर्वसूचना देण्याचे फलक लावण्‍यात आलेले आहेत.

मोकाट गुरांचे बस्‍तान; पथदीपांचा अभाव: या महामार्गावर रात्रीच्या वेळी काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे अनेकदा रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. तसेच या महामार्गावर मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात.

तसेच, अशावेळी भरवेगात असलेल्या वाहनचालकाला गुरांना वाचविणे कठीण जाते व या प्रयत्नात अपघातात घडतात. महामार्गावर गुरे येऊ नयेत यासाठी स्थानिक पंचायतीकडूनही उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी केली जात नाहीय.

प्रबोध शिरवईकर, वाहतूक पोलिस उपअधीक्षक-

राष्ट्रीय महामार्गावरील नियमांचे पालन वाहनचालकांकडून केले जात नाही. रस्‍त्‍याच्‍या बाजूला वेगमर्यादा फलक असूनही चालक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत. प्रत्येकाला लवकर जाण्याची घाई असते. त्यावर संयम ठेवण्याची गरज आहे.

ओव्हरटेक करताना अपघात होण्याचा संभव असतो. तरी धोका पत्करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक वाहनचालकाने घाई न करता नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT