Goa Bus Driver Alcohol Case Dainik Gomantak
गोवा

Goa News: दारू पिऊन चालवली बस, घातली ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर! म्हापशातील घटनेने खळबळ; बसचालकावर दंडाची कारवाई

Goa Bus Driver Alcohol Case: दारूच्या नशेत प्रवासी बस चालवल्याच्या गंभीर आरोपाखाली डिचोली येथील बसचालक विशांत पाडेलकर याला न्यायालयाने ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: दारूच्या नशेत प्रवासी बस चालवल्याच्या गंभीर आरोपाखाली डिचोली येथील बसचालक विशांत पाडेलकर याला न्यायालयाने ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. म्हापसा वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली.

गांधी चौक, म्हापसा येथे वाहतूक पोलिस बंदोबस्ताची सेवा बजावत असताना म्हापसा कदंब बसस्थानकातून इब्रामपूरच्या दिशेने जाणारी जीए–०४–टी–४४७० क्रमांकाची प्रवासी बस अचानक पोलिसांच्या दिशेने आली.

बसचा वेग आणि चालकाची संशयास्पद हालचाल पाहून पोलिसांनी तत्काळ बस थांबवली. तपासणीदरम्यान बसचालक विशांत पाडेलकर दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी केली असता त्यात मद्यप्राशन केल्याची पुष्टी झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी संबंधित चालकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. सार्वजनिक वाहतूक चालवणाऱ्या चालकांनी जबाबदारीने वागावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT