

पणजी: खोर्ली म्हापसा येथे २०१७ मध्ये पाळीव शेळ्यांच्या वादातून तक्रारदार आदम शेख यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या रफिक बेनकीपूर (३७) याला म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने हत्येचा प्रयत्न आणि अपमानास्पद वर्तणुकीबद्दल दोषी ठरवले आहे.
न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी हा निकाल दिला असून आरोपीला १८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपीने अटकेनंतर (१० नोव्हेंबर २०१७ ते २८ नोव्हेंबर २०१७) आधीच १८ दिवस कोठडीत घालवले असल्याने ''क्रिमिनल प्रोसिजर कोड''च्या कलम ४२८ नुसार, हा कालावधी त्याच्या शिक्षेतून वजा करण्यात आला आहे.
त्यामुळे, न्यायालयाने दिलेला दंड भरल्यानंतर आरोपीची प्रत्यक्ष कारावासातून सुटका होणार आहे. ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास त्याला पुन्हा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. १० नोव्हेंबर २०१७ रोजी म्हापसा येथील गंगासागर, खोर्ली येथे पाळीव शेळ्यांच्या वादातून बेनकीपूर याने तक्रारदार आदम शेख यांच्या डोक्यावर आणि छातीवर चाकूने वार केले होते.
या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यादरम्यान तक्रारदाराने प्रकरण मिटले असल्याचे सांगत पुढे न जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत असलेला गुन्हा हा ''नॉन-कंपाऊंडेबल'' असून तो पुराव्यांच्या आधारावर चालवणे आवश्यक आहे.
न्यायालयाने ८ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. तक्रारदार आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे दोषी ठरविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.