Goa Jeweller Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Jeweller Fraud: दागिने परत न करणाऱ्या सोनाराविरुद्ध 3 तक्रारी; 14 लाखांची फसवणूक, वास्को पोलिसात तक्रार

Pledged Gold Ornaments Dispute: गहाण ठेवलेले १४ लाखांचे दागिने परत करण्यास सोनाराने नकार दिल्याने सडा येथील एका महिलेने मुरगाव पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: गहाण ठेवलेले १४ लाखांचे दागिने परत करण्यास सोनाराने नकार दिल्याने सडा येथील एका महिलेने मुरगाव पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. आत्तापर्यंत त्या सोनाराविरोधात तीन महिलांनी तक्रारी केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी संबंधित महिलांनी पोलिसांनी न सापडणारा त्या सोनाराला पकडून वास्को पोलिस स्थानकात आणले होते.

आमचे दागिने परत मिळवून द्या अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यासमोर आपली कैफियत मांडण्याचा विचार त्या महिलांनी चालविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सडा येथील सरकारी विद्यालयासमोर भीमाप्पा चलवादी याचे पीबीसी ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात त्या महिलेने दोन वेगवेगळ्या प्रसंगी सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते.

पहिल्यांदा २ लाख ७० हजार रुपयांचे व दुसऱ्यांदा २ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गहाण ठेवलेल्या सोन्याची किंमत १४ लाख होते. त्यानंतर त्या महिला कर्जाची रक्कम परत करण्यासाठी आली असता चलवादीने ते दागिने आपण वितळवल्याचे सांगितले. त्याने कर्जाची रक्कम स्वीकरण्यास तसेच गहाण ठेवलेले दागिने परत करण्यास नकार दिला. चलवादीने विश्र्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी त्या महिलेने पोलिस स्थानकात धाव घेतली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक साईदत्त पुढील तपास करीत आहेत.

गहान ठेवलेले दागिने वितळविले!

या सोनाराने महिलांनी गहाण ठेवलेले दागिने वितळवल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. काही महिलांनी कर्जाची रक्कम फेडलेली असतानाही त्याने गहाण ठेवलेले दागिने परत केले नाही. त्यामुळे त्या सोनाराला लाखो रुपयांचे दागिने फुकटात मिळाले आहेत. आमचे दागिनेही गेले, पैसेही गेले आम्ही आता काय करावे या चिंतेत त्या महिला आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT