Sattari Janata Darbar Dainik Gomantak
गोवा

Goa Janata Darbar: दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग; मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

सत्तरी, काणकोण येथे पार पडला जनता दरबार

Akshay Nirmale

Goa Janata Darbar: गोव्यात आज, सोमवारी सत्तरी आणि काणकोण येथे जनता दरबार पार पडला. सत्तरीतील जनता दरबारात समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई तर काणकोण येथील जनता दरबारात मत्स्य व्यवसाय मंत्री नीळकंठ हालरणकर हे अध्यक्षस्थानी होत.

या दोन्ही जनता दरबाराचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. स्थानिकांनी मांडलेल्या सर्व तक्रारी मंत्र्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहिती दिली.

घरगुती नळजोडणी, पाणीपुरवठा, सिंचन, शेतीविषयक समस्या, मासळी मार्केट, रस्तेबांधणी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व इतर नागरी समस्यांबाबत लोकांनी त्यांची गाऱ्हाणी मांडली.

सत्तरीत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आणि आगामी पर्पल फेस्ट या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात मिनी राष्ट्रीय खेळांचा समावेश करणार असल्याचे सांगितले.

तसेच एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल आणि एक महिन्याच्या आत लोकांच्या प्रलंबित तक्रारींबाबत अहवाल सादर करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. मंत्री फळदेसाई यांनी सर्व समाजकल्याण योजना लाभार्थ्यांपर्यंत त्वरीत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला.

काणकोण येथे बोलताना मंत्री हळर्णकर म्हणाले, सरकारी योजना आणि सेवांचा लाभ जनतेने घ्यावा. लोकांना त्यांच्या नागरी समस्या मांडता याव्यात यासाठी जनता दरबार सारखे उपक्रम आयोजित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

SCROLL FOR NEXT