GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

GARD resident doctors Goa: निवासी डॉक्टरांच्या दरमहा विद्यावेतनात (स्टायपेंड) वाढ घडवून आणत समितीने आपल्या कार्यकाळाचा अहवाल अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे.
GMC Resident Doctors
GMC Resident DoctorsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टरांची संस्था ‘गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’(गार्ड)च्या २०२५-२६ च्या समितीने एक वर्षाच्या कार्यकाळात ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.

निवासी डॉक्टरांच्या दरमहा विद्यावेतनात (स्टायपेंड) वाढ घडवून आणत समितीने आपल्या कार्यकाळाचा अहवाल अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. राज्य सरकारने यावर्षी स्टायपेंड वाढीची घोषणा केल्याने हा निर्णय डॉक्टरांच्या कष्टाचा आणि जबाबदारीचा योग्य सन्मान असल्याचे ‘गार्ड’ने म्हटले आहे.

२ सप्टेंबर २०२५ रोजी ‘डॉक्टरांसाठी, डॉक्टरांकडून आणि डॉक्टरांच्या सोबतीने’ या ब्रीदवाक्यासह पदभार स्वीकारलेल्या समितीने गेल्या १२ महिन्यांत विविध आघाड्यांवर केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल त्यांनी जारी केला आहे.

GMC Resident Doctors
Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

मेडिसीन विभागातील वरिष्ठ डॉक्टरांसोबतच्या समस्यांविषयी डॉ. मोहम्मद अक्रम व सहकाऱ्यांच्या तक्रारीवर प्रशासकीय चौकशीत पारदर्शकता आणण्याची मागणी गार्डने केली. अपघात विभागातील वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती आणि बायोकेमिस्ट्री विभागातील रात्रपाळीच्या समस्या तत्परतेने सोडविल्या, तसेच आरोग्य संचालनालयांतर्गत सेवा देणाऱ्या सीनिअर रेसिडेंट्सच्या पदांची पुनर्रचना व त्यांना योग्य मानधन आणि प्रमाणपत्र मिळावे यासाठी पाठपुरावा केला.

शैक्षणिक, धोरणात्मक योगदान

‘एनएमसी’ टास्क फोर्स आणि ‘पीजीएमइआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार डिनला निवेदन सादर केले. त्यानुसार कामाच्या तासांबाबत परिपत्रक जारी करण्यात आले. नवीन ‘गार्ड हॉस्टेल’ इमारतीच्या आराखड्याची तपासणी करून निवासी डॉक्टरांच्या गरजांचा त्यात समावेश केला. ई-लॉगबुक आणि शैक्षणिक अडचणींवर प्रशासनाशी समन्वय साधून तोडगा देखील काढण्यात आला.

GMC Resident Doctors
Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

राष्ट्रीय पातळीवर ‘गार्ड’चे नेतृत्व

फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘गार्ड’चे तत्कालीन अध्यक्ष लक्ष्य झा यांची ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली. गोव्याच्या रेसिडेंट डॉक्टरांच्या चळवळीत प्रथमच राष्ट्रीय स्तरावर हे पद मिळाले. डॉक्टरांच्या कामाचे तास, मानवी हक्क आणि मानसिक आरोग्याशी संबंधित राष्ट्रीय सर्वेक्षणात गोव्यातील डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गोव्याने देशात ५ वा क्रमांक पटकावला.

निवासी डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा; व्यक्तीपेक्षा संघटना मोठी!

नवीन समितीकडे सूत्रे सोपवताना २०२५-२६ च्या समितीने सर्व विभाग प्रतिनिधी आणि डॉक्टरांचे आभार मानले. आगामी प्रतिनिधींना संदेश देताना समितीने नमूद केले की, ‘गार्ड’ ही कोणत्याही व्यक्ती, समिती किंवा कार्यकाळापेक्षा मोठी आहे.

निवासी डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, त्यांचे ऐका, त्यांचे प्रतिनिधित्व करा आणि या संस्थेला मिळालेल्या स्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत ठेवण्याचे आवाहन ‘गार्ड’चे माजी अध्यक्ष लक्ष्य झा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com