

पणजी: पर्वरी येथील उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱ्या भरधाव वाहनांच्या गतीला लगाम घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण खात्याने स्पीड कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे अवघ्या १० दिवसांत ५८० वाहनांनी वेगमर्यादा ओलांडली असल्याचे या कॅमेऱ्यांनी टिपले आहे. त्यामळे स्पीड कॅमेरे लावूनही वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पर्वरीचा उड्डाणपूल ११ सप्टेंबर रोजी खुला करण्यात आल्यापासून आतापर्यंत येथे चार अपघात झाले आहेत. त्यात दोन जणांचा जीव गेला आहे. यावरून सरकारने उद्घाटनाची प्रक्रिया घाईगडबडीत केल्याचे आणि कोणतेही नियोजन केले नसल्याचे म्हणत विरोधकांनी सरकारवर आगपाखड करण्यात आली होती.
त्याशिवाय स्थानिक आमदारांनीही या घटनेनंतर सावध भूमिका घेतली होती. आपल्याला विश्वासात घेतले गेले नसल्याचे सांगत आमदाने आपली बाजू सुरक्षीत करण्याचा प्रयत्न केला. चोहोबाजूने टीका सुरू झाल्यानंतर पर्वरी उड्डाणपूल ते मेरशी सर्कल येथील वाहतुकीचा प्रवाह आणि हालचालींचा सविस्तर अभ्यास करण्याची जबाबदारी आयआयएम नागपूरच्या एका तज्ज्ञ पथकाकडे सोपविली गेली होती.
ई-चलन जारी करून दंडात्मक कारवाई
पहिल्या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने उड्डाणपुलाची संयुक्त पाहणी केली होती. या पाहणीनंतर १५ सप्टेंबर रोजी पुलावर दोन स्पीड कॅमेरे बसविले गेले, तेव्हापासून २५ सप्टेंबरपर्यंत ५८० वाहनांनी वेगमर्यादा ओलांडल्याचे दिसून आले आहे. या वाहनधारकांना ई-चलन जारी करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.