Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : देशात लोकशाही व घटनेचे रक्षण हे आमचे कर्तव्य : विजय सरदेसाई

Goa News : शुक्रवारी संध्याकाळी मडगावच्या बीपीएस क्लबजवळील आसरो सोसायटीलगतच्या रस्त्याचे ‘स्वातंत्र्यसैनिक आनास्तासियो आल्मेदा’ असे नामकरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सासष्टी, देशात लोकशाही व घटनेचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे मत फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त करून लोकांनी यावेळी समजुतदारपणे मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी मडगावच्या बीपीएस क्लबजवळील आसरो सोसायटीलगतच्या रस्त्याचे ‘स्वातंत्र्यसैनिक आनास्तासियो आल्मेदा’ असे नामकरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

स्व. आनास्तासियो आल्मेदा हे महान नेते व स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी गोव्याच्या मुक्तीलढ्यावेळी कित्येक वर्षे कारावास भोगला होता. त्यांच्या नावाने यापेक्षा जास्त मोठे कार्य व्हायला पाहिजे, असेही सरदेसाई म्हणाले.

ॲड. राधाराव ग्रासियस यांनी सांगितले, की आनास्तासियो आल्मेदा हे त्यावेळेचे मास्टर ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर होते. ते बॅंकेतही काम करत होते. मात्र, गोव्याच्या मुक्तीलढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. गोव्यातील जे अस्सल स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्या पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मेडिकल क्षेत्रात खळबळ! विषारी इंजेक्शन देऊन 10 रुग्णांची केली हत्या, 'सीरिअल किलर' नर्सला कोर्टाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

अग्रलेख: गोव्यातील वाढती 'गुन्हेगारी' हा चिंतेचा विषय! प्रशासन आता तरी जागे होईल का?

Konkani Drama Competition: ‘नाविन्या’च्या नादात वाट चुकलेला प्रयोग ‘रंग-सूत्र’; नाट्यसमीक्षा

Cricketer Banned : क्रिकेट विश्वात खळबळ! स्टार खेळाडूवर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, बोर्डाने ठोठावली बंदी

SCROLL FOR NEXT