पणजी: गोवा पर्यटन विभाग सध्या उझबेकिस्तान सोबतचे सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करत आहे. ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्यातील गेल्या वर्षीच्या सहभागाच्या यशानंतर गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एक शिष्टमंडळ उझबेकिस्तान सोबत हातमिळवणी करण्याचे नवीन मार्ग शोधात आहे.
समुद्रकिनाऱ्याच्या पलीकडे असलेल्या गोव्याला पर्यटनाचे केंद्रबिंदू बनवण्याचा या प्रयत्नाचा प्रमुख उद्देश आहे. यासोबतच गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, वेलनेस ऑफरिंग, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आणि शाश्वत पर्यटन पद्धती यावर प्रकाश टाकणे हे विभागाचे उद्दिष्ट आहे.उझबेकिस्तानहून गोव्याला थेट विमानसेवा सुरु झाल्याने गेल्या वर्षात सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या होत्या.
शिष्टमंडळाकडून सध्या स्थानिक पातळीवरील टूर ऑपरेटर्स आणि ट्रेड पार्टनर्स यांच्या गरजा समजून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या गरजा ओळखून आणि प्रश्न सोडवत गोवा पर्यटन विभागाला उझबेकिस्तानहून येणाऱ्या पर्यटकांसाठी गोवा हे प्रमुख, सुरक्षित आणि आकर्षक ठिकाण बनवायचे आहे.
ताश्कंद इंटरनॅशनल टुरिझम फेअर हा या प्रदेशातील एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो, जो युरोपियन आणि रशियन प्रवासी आणि टूर ऑपरेटर्सला आकर्षित करतो, या माध्यमातून जागतिक स्थरावर गोवा पर्यटनाची ओळख निर्माण करण्याची एक अनोखी संधी गोव्याला मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.