Goa Tourism: 1990 च्या दशकातील गोव्याची पर्यटनातील मक्तेदारी कशी संपतेय; चेतन भगतने सांगितले नेमकं काय गंडतंय

Chetan Bhagat On Goa Tourism: जगातील इतर पर्यटन स्थळांनी वाढती स्पर्धा समजून घेत किमती कमी ठेवून पर्यटकांसाठी अनुकूल धोरणे तयार केली.
Goa Tourism: 1990 च्या दशकातील गोव्याची पर्यटनातील मक्तेदारी कशी संपतेय; चेतन भगतने सांगितले नेमकं काय गंडतंय
Chetan Bhagat On Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Chetan Bhagat On Goa Tourism

पणजी: तिरुपती किंवा वैष्णव देवी या स्थळांबाबत असलेल्या श्रद्धेमुळे भक्त आणि पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. पण गोव्यासारखे पर्यटनस्थळ ही वेगळी बाब आहे. 1990 च्या दशकात गोव्याची मक्तेदारी होती.

भारतातील लोकांना तुलनेने परवडणाऱ्या दरात समुद्रकिनारे, स्वस्त दारू आणि पार्ट्यांचा आनंद घेता येणारे हे एकमेव ठिकाण होते. भारताला हजारो किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, पण असे असतानाही आपल्याला दुसरा गोवा निर्माण करता आलेला नाही.

ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा गोव्यासारखी आंतरराष्ट्रीय ठिकाणे भारतीयांच्या आवाक्याबाहेर होती. हवाई प्रवास महाग होता, व्हिसा मिळणे कठीण होते आणि चांगल्या समुद्रकिनाऱ्यांशी सहज संपर्क नव्हता. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पर्यटन नकाशावरही गोवा हिप्पी डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध होता. पण जग आता बदलले आहे.

कमी किमतीच्या कॅरिअर्समुळे हवाई प्रवास खिशाला परवडणारा झाला आहे. दक्षिण-पूर्व पायाभूत सुविधा, उत्तम अनुभव आणि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत विकसित झाली आहेत. इंटरनेट आले आहे, त्यामुळे तिकीट, हॉटेल बुक करणे आणि व्हिसा मिळवणे सोपे झाले आहे. सोशल मीडियामुळे लोकांना नवीन ठिकाणांचा शोध घेणे सोपे झाले आहे.

Goa Tourism: 1990 च्या दशकातील गोव्याची पर्यटनातील मक्तेदारी कशी संपतेय; चेतन भगतने सांगितले नेमकं काय गंडतंय
Goa Tourism: गोव्याची बदनामी करण्याचा छुपा अजेंडा, 'तो' व्हायरल डेटा चीनचा; पर्यटन वादावर पर्यटनमंत्री पहिल्यांदाच बोलले

जगातील इतर पर्यटन स्थळांनी वाढती स्पर्धा समजून घेत किमती कमी ठेवून पर्यटकांसाठी अनुकूल धोरणे तयार केली. पण गोवा आणि भारताचा विचार वेगळा होता. जे काही चांगलं, अद्भूत आणि मजेदार असेल त्यावर नवीन नियम, कायदे आणि कर लादले जावेत, असा समज भारतात फार पूर्वीपासून आहे.

गोव्यात ७,५०० रुपये भाडे असलेल्या खोल्यांवर २८ टक्के GST आकारला जातो. येत्या वीकेंडसाठी दिल्ली-गोवा किंवा दिल्ली-फुकेत (थायलंड) हवाई तिकिटांवर नजर टाकल्यास त्यांच्या किमती जवळपास सारख्याच असल्याचे दिसून येते.

हॉटेलांच्या बाबतीतही असेच आहे. दरम्यान, फुकेतमधील उच्च श्रेणीची हॉटेल्स अगदी स्वस्त आहेत. फुकेतमधील रस्ते चांगले आहेत, समुद्र आणि किनारे स्वच्छ आहे आहेत, कॅब स्वस्त आहेत आणि खाण्यापिण्याचे अधिक पर्याय आहेत. एकट्या थायलंडमध्ये नव्हे जगाच्या पाठीवर अशी आणखी बरीच ठिकाणे आहेत.

यात व्हिएतनाम, मलेशिया, श्रीलंका आणि भारतीयांची आवडती दुबई यांचा समावेश आहे. ही सर्व ठिकाणे गोव्यात येणाऱ्या खर्चाच्या किमतीत पर्यटनाची समान संधी देतात, पण अधिक चांगल्या आणि परदेशी पर्यटन अनुभवासह.

गोव्याकडे अजूनही देशी पर्यटक आकर्षित होतात. पुणे, मुंबई किंवा बेंगळुरू येथील रहिवाशांसाठी हे अजूनही एक अनोखे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, येथे लोक इनोव्हामध्ये बसून कळंगुटला जाऊ शकतात किंवा ट्रेनही प्रवास करु शकतात. त्यामुळेच गोवा कधीच ओसाड होणार नाही.

Goa Tourism: 1990 च्या दशकातील गोव्याची पर्यटनातील मक्तेदारी कशी संपतेय; चेतन भगतने सांगितले नेमकं काय गंडतंय
Goa Tourism Stats Row: गोवा सरकारच्या तक्रारीनंतर रामानुजन मुखर्जी यांची संतप्त प्रतिक्रिया; "हा तर..."

गोव्यात उच्चभ्रू पर्यटक कमी होत आहेत. पण, सर्व पर्यटक सारखे नसतात. समजा विरारचा पर्यटक रोज ५०० रुपये खर्च करतो. स्वस्त गेस्ट हाऊसमध्ये राहतो, किरकोळ दुकानातून बिअर खरेदी करण्यासाठी दररोज ५,००० रुपये किंवा अगदी २०,००० रुपये खर्च करतात. उच्चभ्रू पर्यटकांकडे परदेशात चांगले पर्याय आहेत, त्यामुळे त्यांना गोव्यात सुट्टी घालवण्याचे फारसे कारण नाही.

पर्यटनाच्या बाबतीत आपण जगाशी जुळवून घेत नसल्याचे सिद्ध होत आहे. आम्हाला टॅक्सी-कार्टेल संपवायला हवं, लोकांना पाच मिनिटांत कार आणि ड्रायव्हर त्यांच्या दारात उभं करण्याची सवय झालीय, तेही परवडणाऱ्या दरात. लक्झरी रूमचा जीएसटी कमी करावा लागेल. थायलंडने पर्यटनाला चालना देण्यासाठी हॉटेल कर १० टक्क्यावरून ७ टक्के पर्यंत कमी केला.

आपणही असे का करू शकत नाही? पर्यटक म्हणून आपल्याला Sunset Point च्या पलीकडे विचार करायला हवा. आजही भारतीय पर्यटक पर्यटनाला मौजमजा आणि विश्रांतीची गोष्ट मानत नाहीत. परिणामी, त्या अनुभवांची पूर्तता करण्यासाठी आम्ही आमची पर्यटन स्थळे विकसित करत नाही.

आणि हो, आम्हाला परदेशी पर्यटकांना देखील योग्य वागणूक देणं गरजेचे आहे. विशेषतः टक लावून पाहणे, योग्य कपडे न घालता समुद्रात जाणे, कचरा करणे आणि गोंगाट या देशांतर्गत समस्या दूर करायला हव्यात.

या लेखातील माहिती चेतन भगत यांच्या ब्लॉगवरील लेखाचा मराठी अनुवाद आहे. चेतन भगत यांचा मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com