Goa Per Capita Income Dainik Gomantak
गोवा

Goa Economy: पैसाच पैसा! Per Capita Income मध्ये गोव्याने पटकावला दुसरा क्रमांक; मग पाहिलं कोण?

Goa Per Capita Income: वर्ष 1970-71 मध्ये गोव्याच्या पर कॅपिटा इनकमचा आकडा 144 टक्के होता जो आता वाढून 290 टक्के झाला आहे

Akshata Chhatre

Goa Per Capita Income Rise

पणजी: भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत गोवा दुसरं सर्वात श्रीमंत राज्य बनलंय. दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इनकम (Per Capita Income)च्या आधारे सिक्कीम सर्वात श्रीमंत राज्य आहे आणि त्यानंतर गोव्याचा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादना (GDP)त गोव्याचे योगदान मात्र 0.5 टक्क्यांवरून 0.3 टक्क्यांवर घसरले आहे.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गोव्याच्या पर कॅपिटा इनकममध्ये वाढ झालीये. वर्ष 1970-71 मध्ये गोव्याचे पर कॅपिटा इनकम दुप्पट झाले होते आणि आता 2022-23 मध्ये राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत यात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे आणि म्हणूनच सिक्कीम नंतर गोव्याचा क्रमांक लागतो.

वर्ष 1970-71 मध्ये गोव्याच्या पर कॅपिटा इनकमचा आकडा 144 टक्के होता जो आता वाढून 290 टक्के झाला आहे. सिक्कीमच्या पर कॅपिटा इनकमचा आकडा 319 टक्के असल्याने ते देशातील सर्वात श्रीमंत राज्य बनले आहे.

गोव्याचा GDP आकडा घसरला:

गोव्याने पर कॅपिटा इनकमच्या आकड्यात वाढ केली असली तरीही सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) गोव्याचे योगदान मात्र घटले आहे. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाणा सध्या आर्थिक दृष्ट्या सक्षम दिसत आहेत. उत्तर भागातील राज्यांच्या तुलनेत दिल्लीचा पर कॅपिटा इनकमचा आकडा चांगला आहे मात्र हरयाणाच्या आकड्यात काहीशी घट झाली आहे तसेच, देशाचा पूर्वेकडचा भाग तसेच पश्चिम बंगाल आर्थिक दृष्टया कमकुवत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT