पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब घटकांना मोफत सौर ऊर्जा देण्याचा संकल्प केला असून गोव्यातही ही योजना चालवण्यात आली आहे. निर्धारित वीज बिलाच्या ग्राहकांना या सेवेचा लाभ मिळणार असून त्यासाठी मोफत सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे. या सौर ऊर्जेमुळे ग्राहकाला शून्य बिल येणार असून इच्छुकांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. सौर उर्जा सबसिडी ही योजना केवळ पर्यावरणपूरक नाही तर वाढत्या वीज बिलांपासून लोकांना दिलासा देणारी आहे.
सौर ऊर्जा सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करु शकता. ज्यांना त्यांच्या घरात सोलर सिस्टीम बसवायची आहे परंतु आर्थिक अडचण आहे विशेषत: त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे.
या योजनेअंतर्गत तुम्ही 1 किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेची सोलर पॅनल यंत्रणा बसवू शकता. सिस्टमची किंमत 5 ते 6 वर्षांमध्ये वसूल होते, त्यानंतर तुम्ही दीर्घकाळ वीज बिलांपासून मुक्त राहू शकता.
1) सगळयात आधी अधिकृत वेबसाइट https://pmsuryaghar.gov.in वर जा आणि रुफटॉप सोलर याची निवड करा.
2) यानंतर तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाका.
3) नवीन पेजवर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल टाकून लॉगिन करा.
4) फॉर्म उघडल्यावर, त्यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुफटॉप सोलर पॅनेलसाठी अर्ज करा.
5) हा अर्ज पूर्ण भरल्यावर व्यवहार्यता मंजूरी मिळेल, यानंतर तुम्ही नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट बसवू शकता.
1) कोणताही भारतीय नागरीक, संस्था
2) स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी
3) हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी
4) अर्जदाराकडे वीज जोडणी असावी
मोबाईल नंबर
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
मतदार ओळखपत्र
बँक पासबुक
उत्पन्न प्रमाणपत्र
वीज बिल
छताचा फोटो (जिथे सौर पॅनेल बसवायचे आहे)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.