Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Police : पोलिस खात्याच्या क्रियाशील अधिकाऱ्यांमुळे गोवा सुरक्षित : सभापती तवडकर

Goa Police : यावेळी व्यासपीठावर पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंह, कमांडट एडविन कुलासो, नगराध्यक्ष सारा देसाई, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत उपस्थित होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद, शिपायांपासून अधिकारी वर्गाने निष्ठेने काम केल्यास स्वतंत्र ओळख निर्माण होते. पोलिस खात्याच्या क्रियाशील अधिकाऱ्यांमुळे गोवा सुरक्षित आहे. गोव्याचे मुख्यमंत्री व पूर्व आयजीपी जसपाल सिंग यांनी आयआरबी केंद्र बनविण्यासाठी मेहनत घेतली.

त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. शेळेर - काणकोण येथे आज गोवा आर्म फोर्सच्या मल्लिकार्जुन गोवा पोलिस आर्म फोर्स केंद्राचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंह, कमांडट एडविन कुलासो, नगराध्यक्ष सारा देसाई, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत उपस्थित होत्या.

काणकोण येथील मल्लिकार्जुन, वाळपई, सांगे अशा तीन ठिकाणी आयआरबी केंद्रे असून राज्यात अशांती झाल्यास तातडीने मदत करण्यात ही केंद्रे साहाय्यभूत ठरतील.

पोलिस फोर्सला अत्याधुनिक बनविण्यात येत असून स्थानिक पोलिसांना शांती प्रस्थापित करण्यात मदत करणार असल्याचे आयजीपी ओमवीर सिंह यांनी सांगितले. यावेळी प्रांगणात सभापतींच्या हस्ते रोपटे लावण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवसानिमित्त केक कापून यावेळी सभापती रमेश तवडकर यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT