Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM Pramod Sawant: गोवा भोग नव्हे योगभूमी, जगात भारताची 'हिंदुस्थान' म्हणून ओळख; मुख्यमंत्री सावंत

Goa News: गोव्याला अध्यात्मिक पर्यटनाची राजधानी बनवण्याच्या दृष्टीने सरकारने अनेक प्रकल्प राबवले आहेत, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Pramod Yadav

फोंडा: भारत देशाला जगभर 'हिंदुस्थान' या नावाने संबोधले जाते, ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असून गोवा म्हणजे भोगभूमी असल्याचा अपप्रचार केला जातो. परंतु गोवा ही भोगभूमी नसून योगभूमी आहे. शंखनाद महोत्सवासारखे उपक्रम गोव्याची आध्यात्मिक ओळख दाखवतात, असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

फर्मागुढी फोंडा येथे आजपासून (१७ मे) सुरू झालेल्या तीन दिवसीय शंखनाद महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. फर्मागुढी येथील विस्तीर्ण मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सनातन संस्थेचे प्रमुख सच्चिदानंद सद्‌गुरू जयंत आठवले, कुंदा आठवले, कुंडई तपोभूमीचे पीठाधीश सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई तसेच म्हैसूरचे राजे यदुवीर कृष्णदत्त वडियार, 'सुदर्शन न्यूज'चे सुरेश चव्हाणके सनातन संस्थेचे वीरेंद्र मराठे आणि अभय वर्तक उपस्थित होते.

'गोव्याला अध्यात्मिक पर्यटनाची राजधानी बनवण्याच्या दृष्टीने सरकारने अनेक प्रकल्प राबवले आहेत. सप्तकोटेश्वर मंदिराचे नूतनीकरण व सुशोभीकरण, मंगेश, शांतादुर्गा आणि तांबडी सुर्ला अशा मंदिरे-परंपरेचे जतन करत ‘होम स्टे’, रस्ते-वीज-इतर पायाभूत सुविधा निर्माण, ऐतिहासिक दस्तऐवजांचे प्रदर्शन यांसारख्या सुविधांच्या उभारणी सह गोव्यात धार्मिक पर्यटन वाढविण्यासाठी कार्य केले आहे', असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

प्रचंड गर्दी; पण सर्व शिस्तीत !

शंखनाद महोत्सवाला साधक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांची प्रचंड गर्दी होती. तब्बल २५ हजार जणांनी या महोत्सवासाठी नोंदणी केली होती. गर्दी झाली असली तरी सर्व काही शिस्तीत सुरळीत पार पडले. विशेष म्हणजे येथे मांडण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजकालीन शस्त्रांचे आणि संतमहंतांच्या पादुकांचे प्रदर्शन लक्षणीय ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT