Goa: हिंदुत्वासाठी गोवा ओळखला जावा, सनातन धर्मात सामावलाय जागतिक शांततेचा संदेश; स्वामी ब्रम्हेशानंद

Goa News: गोवा ही ‘बीच’वर (समुद्रकिनारी) बसण्याची नाही, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी आहे; देवकीनंदन ठाकूर
Sankhnad Mohvotsav
Sankhnad Mohvotsav Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: 'गोवा हिंदुत्वासाठी ओळखला जावा. सनातन धर्म टीकला आणि वाढला तर जगात शांतता प्रस्थापित होईल', असे वक्तव्य पद्मश्री सदगुरु ब्रम्हेशानंद आर्चार्य स्वामी यांनी केले आहे. 'मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत द्रष्टे नेते असून ते गोव्यात हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत', असेही स्वामी ब्रम्हेशानंद म्हणाले.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पद्मश्री सदगुरु ब्रम्हेशानंद आर्चार्य स्वामी बोलत होते.

Sankhnad Mohvotsav
Bangladesh: प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्याला बांगलादेशात अटक

राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. तसेच, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर, आमदार चंद्रकांत शेट्ये, उल्हास तुयेकर याशिवाय २३ देशांतील १९ हजारांहून अधिक भाविक उपस्थित आहेत.

'मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यात हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत. सर्व हिंदुंनी एकत्र येण्याची गरज आहे. सनातन धर्मात जागतिक शांततेचा संदेश सामावला आहे', असे स्वामी ब्रम्हेशानंद म्हणाले.

Sankhnad Mohvotsav
Viral Post: Girls Stay Safe! गोव्यातील बीचवर महिला पर्यटकांसोबत घडला धक्कादायक प्रकार, शेअर केला अनुभव Video

पूर्वी गोव्याची ओळख केवळ सन, सँड आणि सी अशी होती. पण, आता लोक गोव्यात अध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी देखील येतात, पर्यटक मंदिरांना भेट देतात. भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदुस्थानी आहे, याचा धर्माशी काहीही संबंध नाही. देशात समान नागरी कायदा लागू करणारे गोवा पहिले राज्य आहे, असे मुख्यमंत्री सावंत यावेळी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सनातन धर्म आणि सनातन राष्ट्राचा प्रचार करण्यात सनातन संस्थेच्या योगदानाचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com