Irish women was found dead at Candolim Dainik Gomantak
गोवा

Goa: कांदोळीत आयरिश महिला मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

आयरिश महिला एकाअपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहत होती

दैनिक गोमन्तक

म्हापसा: मेरी गर्ट्रूड मॅकनामारा (Mary Gertrude McNamara) नामित 66 वर्षीय आयरिश (Irish National) महिला कांदोळी (Candolim) येथे एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. त्याच घरात ती मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आतून कुलूप लावले होते. मृत महिलेच्या एका ब्रिटिश मैत्रिणीने तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तिने प्रतिसाद दिला नाही, तेव्हा तीने तिच्या पतीला संपर्क करून ही माहिती दिली. मृत महिलेच्या पतीला माहिती मिळताच तो घरी पोहचला तेव्हा दरवाजा आतून बंद असल्याने त्याने फ्लॅट मालकाला दरवाजा उघडण्यासाठी दुसरी चावी मागितली. आणि दार उघडल्यावर महिलेचा मृतदेह बेडवर झोपलेल्या अवस्थेत आढळला.

या घटनेनंतर महिलेच्या पतीने तात्काळ, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर 108 नंबर डायल करून आपत्कालिन रुग्णवाहिका सेवेची मदत घेण्यात आली आणि मृत महिलेला पीएचसी कांदोळीमध्ये नेण्यात आले जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. महिलेचा मृतदेह त्यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे हलवण्यात आला आणि आज शवविच्छेदन करण्यात आले. त्यामुळे मृतदेह गोवा वैद्यकीय रुग्णालयाच्या शवागारात जतन करण्यात आला आहे. व्हिसेरा अहवाल येईपर्यंत मृत्यूचे कारण सांगण्यात आले नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान ओशेलमध्ये 19 ऑगस्ट रोजी दोन रशियन महिलांच्या अनैसर्गिक मृत्यूंचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे बार्देश तालुका हादरला होता. रशियन मॉडेल आलेक्झेंड्रा री डिजावी आणि एकातिरोना टिटोवा या दोघींच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद हणजूण पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. एकाच दिवशी आणि तासाभराच्या अंतराने ओशेलात हे प्रकार उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

Damodar Saptah: ..पंढरीच्‍या वारकऱ्यांसाठी जशी विठूमाउली, तसा गोव्यातील भाविकांसाठी दामबाब! आख्‍यायिकांनी भरलेला 'देव दामोदर'

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

SCROLL FOR NEXT