Goa: रशियन युवतीच्‍या खूनप्रकरणी मित्राला अटक

मद्यप्राशन केल्‍यानंतर पहाटे ती झोपी गेली तर तिचा मित्र डेनिस घराच्या मुख्य हॉलमध्ये झोपला होता. पोलिसांना एकातेरिना हिचा मृतदेह सापडल्यापासून डेनिस ओशेल येथून फरार होता.
रशियन युवतीचा (Russian girl) मित्राकडूनच (From a friend) खून झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.
रशियन युवतीचा (Russian girl) मित्राकडूनच (From a friend) खून झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.Dainik Gomantak

शिवोली: ओशेल-शिवोली (Oshel-Shivoli) येथे भाड्याच्‍या घरात मृतावस्‍थेत सापडलेल्‍या एकातेरिना तितोवा (३४) या रशियन युवतीचा (Russian girl) मित्राकडूनच (From a friend) खून झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यानुसार हणजूण पोलिसांनी (police) आज शनिवारी मार्ना-शिवोलीत येथून डेनिस क्रियूचकॉय (३७) या रशियन युवकास अटक केली आहे. दरम्यान, संशयिताने आपला गुन्हा कबुल केला (Confessed to the crime) असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी दिली.

रशियन युवतीचा (Russian girl) मित्राकडूनच (From a friend) खून झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.
गोव्यात रशियन मॉडेलच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी घातपाताची शक्यता नाकारली

पेशाने नर्तकी असलेली एकातेरिना ही १९ ऑगस्‍टला मृत्‍यूच्‍या एक दिवस अगोदर ओशेल येथे आपल्‍या खोलीवर डेनिससोबत होती. रात्री भरपूर मद्यप्राशन केल्‍यानंतर पहाटे ती झोपी गेली तर तिचा मित्र डेनिस घराच्या मुख्य हॉलमध्ये झोपला होता. पोलिसांना एकातेरिना हिचा मृतदेह सापडल्यापासून डेनिस ओशेल येथून फरार होता. दरम्यान, शवचिकित्सा अहवालात एकातेरिना हिचा मृत्‍यू नाक आणि गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली व मिळालेल्‍या गोपनीय माहितीच्‍या आधारे आज डेनिस याला अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com