Court Dainik Gomantak
गोवा

Goa IPL Betting: आयपीएल सट्टेबाजी प्रकरण! कोट्यवधींची उलाढाल झाल्याची शक्यता; 34 संशयितांना पोलिस कोठडी

Goa IPL Cricket Betting: क्राईम ब्रँचने तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यावेळी ३७ जणांना अटक केली होती. नागोआ येथील छाप्यावेळी २६ जणांना अटक केली होती.

Sameer Panditrao

पणजी: बांबोळी येथील व्हिलामध्ये तसेच नागोआमधील फ्लॅटमधील क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३४ संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

ही सट्टेबाजी भाड्याने घेतलेल्या मालमत्तेत सुरू असल्याने संबंधित मालकांनी या संशयितांची माहिती जवळच्या पोलिस स्थानकात दिली होती का याची तपासणी करून त्यासंदर्भातची तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्याने दिली.

क्राईम ब्रँचने तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यावेळी ३७ जणांना अटक केली होती. नागोआ येथील छाप्यावेळी २६ जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, तर बांबोळी येथील व्हिलामध्ये अटक करण्यात आलेल्या ८ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

कळंगुट येथील छाप्यात तिघांना अटक करण्यात आली होती, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. बांबोळी व नागोआ या गुन्ह्यामध्ये संशयिताविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्याबरोबरच फसवणूक व तोतयागिरीचा गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यावेळी मोठ्या प्रमाणात बँकेची एटीएम कार्डस् तसेच पासबुक्स सापडले आहेत.

त्यातील काही एटीएम कार्डस् व पासबुक्स हे संशयितांच्या नावावरच आहेत. बँक खात्यांवर किती रक्कमेची उलाढाल झाली याचा तपास करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही सट्टेबाजी सुरू असल्याने कोट्यवधींची उलाढाल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विकेट पडताच टीव्ही बंद करायचे, 'या' महान भारतीय क्रिकेटपटूला मुलगा मानायचे, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'ती' खास पोस्ट चर्चेत!

Goa Politics: ''भाजपने यादी जाहीर केल्यावरच आम्ही उमेदवार देऊ!'', ZP Electionसाठी पाटकरांचा 'वेट ॲण्ड वॉच'चा फॉर्म्युला

ना सनी, ना बॉबी... दिवंगत धर्मेंद्र यांनी बायोपिकसाठी 'या' सुपरस्टारला दिली होती पसंती; म्हणाले होते, "तो खरा सच्चा माणूस''

Goa Tourism: गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनाचा श्रीगणेशा! 'सेलिब्रिटी मिलेनियम'मधून 2000 प्रवासी दाखल

Goa Live News: ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांच्या निधनामुळे IFFI मधील सर्व मनोरंजन कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT