IPL Cricket Betting: आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे रॅकेट उद्ध्वस्त, 4 छाप्यांमध्ये 39 जणांना अटक

Goa Cricket Match Betting: आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा व क्राईम ब्रँचने राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Goa IPL Cricket Match Betting
IPL Cricket BettingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा व क्राईम ब्रँचने राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. क्राईम ब्रँचने तीन, तर कळंगुट पोलिसांनी एका ठिकाणी केलेल्या कारवाईत ३९ जणांना अटक केली आहे.

या छाप्यावेळी १०१ मोबाईल्स, सुमारे ५०० एटीएम बँक कार्डस्, ७० सीमकार्डस्, १७ लॅपटॉप्स, १२ डेस्कटॉप्स तसेच सुमारे १४५ बँक पासबुक्स जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे ४० लाखांच्या आसपास आहे. या सट्टेबाजीचा मुख्य सूत्रधार लकी कलला (राजस्थान) असून या रॅकेटचा आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

क्राईम ब्रँचने मंगळवारी रात्री नागोवा, बांबोळी व कळंगुट येथे छापे टाकले. नागोवा येथील ‘आर ॲण्ड ए’ नावाच्या इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश करत २६ जणांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी १८ मोबाईल फोन्स, ५ लॅपटॉप्स, ३ भारतीय पासपोर्ट, ११ बँक पासबुक, ५४ मोबाईल सीमकार्ड, ८ बँक धनादेश बुक, विविध बँकांचे ३६३ एटीएम कार्डस् यांचा समावेश आहे. बांबोळी येथील भाडेपट्टीवर घेतलेल्या व्हिलावर घातलेल्या छाप्यात ८ जणांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून ८४ बँक पासबुक्स, २७ बँक धनादेश बुक, ८३ मोबाईल फोन्स, ६ लॅपटॉप्स, १२ डेस्कटॉप्स, ६ सीपीयू, ३ राऊटर्स व विविध बँकांचे १०९ एटीएम कार्डस् जप्त केली आहेत. कळंगुट येथील छाप्यात क्राईम ब्रँचने तिघांना अटक करून काही मोबाईल्स तसेच लॅपटॉप्स जप्त केले आहेत.

Goa IPL Cricket Match Betting
Goa Education: महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून; एकाचवेळी 5 महाविद्यालयांना देता येणार पसंती, येथे आहे अर्जाची लिंक

कळंगुट पोलिसांनी सिकेरी येथील फ्लॅटवर क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्या दातला वर्मा (वय ३७ वर्षे) आणि वेजंदला सॅम्बासिवाराव (वय ३६ वर्षे) या आंध्र प्रदेशच्या सट्टेबाजांना अटक करून त्यांच्याकडून १० मोबाईल्स, १ लॅपटॉप व इतर मिळून सुमारे ९५ हजारांचे साहित्य जप्त केले. या दोघांना पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. या सर्व सट्टेबाजांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याखाली तसेच फसवणूक गुन्ह्याखाली अटक करून पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत सहा गुन्हे नोंद

गोवा पोलिसांनी आतापर्यंत क्रिकेट सट्टाप्रकरणी ६ गुन्हे नोंद केले आहेत. दोन गुन्हे जिल्हा पोलिस तर ४ गुन्हे क्राईम ब्रँचने नोंद केले आहेत. आतापर्यंत ४४ जणांना अटक करून ४५ लाखांचे साहित्य जप्त केले आहे. क्राईम ब्रँचने नोंदवलेल्या ४ गुन्ह्यांत ४० जणांना अटक तर ४२.८० लाखांचे साहित्य जप्त केले आहे. जिल्हा पोलिसांच्या २ प्रकरणांमध्ये ४ जणांना अटक व १.७५ लाखांचे साहित्य जप्त केले आहे.

Goa IPL Cricket Match Betting
Goa Education: महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून; एकाचवेळी 5 महाविद्यालयांना देता येणार पसंती, येथे आहे अर्जाची लिंक

गेल्या वर्षीपासून बिनबोभाट सट्टा

नागोवा व बांबोळी येथे नोव्हेंबर २०२४ पासून सट्टेबाजी सुरू होती. आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट चषक, इंडियन प्रीमियर लीग तसेच आता आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टेबाजी सुरू होती. अटक केलेले सर्व सट्टेबाज हे देशातील विविध भागांमधील आहेत. हे सट्टेबाज ग्राहकांनाही मदत करण्याचे कामही करत होते, अशी माहिती अधीक्षक गुप्ता यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com