Goa Shack Policy 2026 Dainik Gomantak
गोवा

Goa Shack Policy 2026: गोव्यात सुधारित 'शॅक धोरण' लागू! समुद्रकिनाऱ्यावर डेक-बेड्स, छत्र्या ठेवण्यासाठी पर्यटन खात्याने मागवले अर्ज

Goa Shack Policy 2026: २२ जून ते ३ जुलै या कालावधीत मडगाव आणि पणजी येथील प्रादेशिक सुविधा केंद्रांवर किंवा खात्‍याच्‍या संकेतस्थळाद्वारे हे अर्ज सादर करता येणार आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सुधारित ‘शॅक धोरणा’अंतर्गत १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत समुद्रकिनाऱ्यांवर डेक-बेड्स, छत्र्या, तसेच टेबल आणि खुर्च्या ठेवण्याच्या परवानगीसाठी पर्यटन खात्‍याने पात्र खासगी शॅक चालक, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सकडून अर्ज मागवले आहेत. २२ जून ते ३ जुलै या कालावधीत मडगाव आणि पणजी येथील प्रादेशिक सुविधा केंद्रांवर किंवा खात्‍याच्‍या संकेतस्थळाद्वारे हे अर्ज सादर करता येणार आहेत.

परवानगीसाठी खात्‍याने परवाना शुल्‍क म्‍हणून ५६ हजार रुपये आणि त्यावर लागू होणारे कर निश्चित केले आहेत. तसेच, अर्जदारांना १० हजार रुपये अर्ज शुल्क आणि ‘जेईएल’ला देण्‍यासाठी ११ हजार रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. ही दोन्ही शुल्के परत न मिळणारी असतील. नवीन अर्जदारांना ५० हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा करणे आवश्यक असेल, असे पर्यटन संचालक केदार नाईक यांनी जारी केलेल्‍या अधिसूचनेत म्‍हटले आहे.

पात्रता काय?

परवानाधारक खासगी शॅक चालक, पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या किंवा गोवा पर्यटक व्यापार नोंदणी अधिनियम, १९८२ अंतर्गत खात्‍याकडे नोंदणीसाठी अर्ज केलेल्या आणि ज्यांच्या खासगी मालमत्तेची पश्चिम सीमा समुद्रकिनाऱ्याला लागून आहे, अशा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सकडून अर्ज स्वीकारले जातील.

डेक बेड, छत्र्या, टेबल आणि खुर्च्या ठेवण्याची परवानगी केवळ पर्यटन खात्‍याने मंजूर केलेल्या सीमांकीत क्षेत्रातच जागेची उपलब्धता, जागेची परिस्थिती आणि इतर संबंधित बाबी विचारात घेऊन दिली जाईल.– सरकारी जमिनी तसेच समुद्रकिनारी क्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्या अर्जदारांचे, संस्थांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.– परवान्यात नमूद केलेला कालावधी संपताच सर्व डेक बेड, छत्र्या, टेबल आणि खुर्च्या तत्‍काळ काढून टाकण्यात याव्यात.– डेक बेडच्या प्रत्येक संचावर परवाना क्रमांक दर्शवणारा रंग दिला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT