Investment Scam Dainik Gomantak
गोवा

Investment Scam: 7.36 कोटींचा घोटाळा उघड, 10 जणांवर गुन्हा; 'डबल रिटर्न'च्या जाळ्यात गुंतवणूकदार

Lavish Chaudhary alias Nawab Ali scam: अधिक परताव्याचे आमिष दाखवून गोव्यातील शेकडो गुंतवणूकदारांची सुमारे ७ कोटी ३६ लाख ५७ हजार १६० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा नोंदवला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अधिक परताव्याचे आमिष दाखवून गोव्यातील शेकडो गुंतवणूकदारांची सुमारे ७ कोटी ३६ लाख ५७ हजार १६० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मुख्य संशयित लव्हिश चौधरी ऊर्फ नवाब अली (मूळचा उत्तर प्रदेश, सध्या रा. दुबई) याच्यासह इतर ९ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि ‘जीपीआयडी’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

डिचोली येथील रहिवासी पूनम यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, लव्हिश चौधरी याने आपण ‘बोटब्रो’, ‘क्यूएफएक्स ट्रेड लिमिटेड’र, ‘यॉर्कर कॅपिटल मार्केट्स’, ‘बोटअल्फा’र, ‘क्रॉस मार्केट्स’ आणि ‘माइन क्रिप्टो’ यांसारख्या कंपन्यांचा संस्थापक असल्याचे भासवले होते. त्याचे इतर ९ साथीदार या कंपन्यांचे प्रवर्तक आणि प्रतिनिधी म्हणून काम करत होते.

संशयितांनी गोव्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवले. त्यांच्या भूलथापांना बळी पडून अनेक गोमंतकीयांनी रोख रक्कम, धनादेश आणि ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र, मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. संशयितांनी हा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आर्थिक गुन्हे विभागाने १८ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३४०(२) आणि ६१(२) सह अन्य कलमांचा समावेश आहे.

पोलिस अधीक्षक अर्शी आदिल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कॉर्टे यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक रमेश शिरोडकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून आणखी किती गुंतवणूकदारांना गंडा घातला गेला आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

शेकडोंची फसवणूक

अधिक परताव्याचे आमिष दाखवून पैसे उकळले

मुख्य संशयित दुबईस्थित; एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा

बनावट कंपन्यांच्या नावाखाली व्यवहार

रोख, धनादेश व ऑनलाइन माध्यमातून गुंतवणूक

मुदतीनंतरही परतावा नाही

निधीचा गैरवापर झाल्याचा संशय

आर्थिक गुन्हे विभागाचा तपास सुरू

आणखी पीडितांची शक्यता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT