

केपे: कुस्मण-केपे येथे बंद घरात आई व मुलीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अलका शिरवईकर (७०) आणि त्यांची मुलगी अनार शिरवईकर (४२) अशी मृतांची नावे आहेत.
केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी १४ रोजी दोघींना शेवटचे केपे बाजारातून घरासाठी साहित्य घेऊन परतताना शेजाऱ्यांनी पाहिले होते. त्यानंतर सलग तीन दिवस त्या घराबाहेर दिसल्या नाहीत. तसेच घरातून कोणतीही हालचाल किंवा आवाज येत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी ही बाब माजी नगरसेविका तेरेझा त्रावासो यांच्या निदर्शनास आणून दिली.
तेरेझा यांनी तातडीने केपे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक नगरसेवक अमोल काणेकर तसेच नागरिकांसह घटनास्थळी धाव घेतली. घराचे दरवाजे बंद असल्याने खिडकीतून पाहणी करण्यात आली. त्यावेळी अलका शिरवईकर या जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या.
दोघींमध्ये वारंवार उडायचे खटके
मिळालेल्या माहितीनुसार, आई व मुलगी अशा दोघीजणीच घरात राहत होत्या. दोघांचेही पटत नसे. त्यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक व्हायची. १४ रोजी बाजारातून आल्यानंतरही त्यांच्यात भांडण झाल्याचे काही शेजाऱ्यांनी ऐकले होते. त्यानंतर दोघीही घराबाहेर दिसल्याच नाहीत.
दोघींमध्ये वारंवार उडायचे खटके
मिळालेल्या माहितीनुसार, आई व मुलगी अशा दोघीजणीच घरात राहत होत्या. दोघांचेही पटत नसे. त्यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक व्हायची. १४ रोजी बाजारातून आल्यानंतरही त्यांच्यात भांडण झाल्याचे काही शेजाऱ्यांनी ऐकले होते. त्यानंतर दोघीही घराबाहेर दिसल्याच नाहीत.
शांत घर पाहून परिसर सुन्न : आई-मुलगी दोघींचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे समजताच परिसरातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. शांत, साधे जीवन जगणाऱ्या या कुटुंबाच्या अशा प्रकारे शेवटाने शेजारी आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.