CM pramod sawant in goa assembly session 2023 Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: खबरदार! गोव्याची बदनामी करणारे रिल्स बनवाल तर...

लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आम्हाला आदर आहे, परंतु त्याचा वापर कोणाच्याही बदनामीसाठी करू नयेत.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant रिल्स बनविण्याच्या नादात कोणाची बदनामी होत नाही, तर ते पर्यटकांनी आणि स्थानिकांनीही पाहिले पाहिजे. कारण आता रिल्सवाले गोवा सायबर पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत. कोणाची बदनामी करणारे रिल्स बनविल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

आमदार दाजी साळकर यांनी शून्य प्रहरात इऩ्स्टाग्रामवर रिल्स बनविणाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आम्हाला आदर आहे, परंतु त्याचा वापर कोणाच्याही बदनामीसाठी करू नयेत.

विशेषतः पर्यटक कोठेही जाऊन व्हिडिओ तयार करतात. अनेकांना स्थळांचे पावित्र्य राखावयाचे असते हे माहीतच नसते. त्यामुळे काहीवेळा बनविल्या जाणाऱ्या रिल्स या बदनामीकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा रिल्स बनविण्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे. गोव्‍यासंबंधी बदनामीकारक असणाऱ्या रिल्स ब्लॉक केल्या जातील आणि बनविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. रिल्स सारख्या प्रकारातून नाहक बदनामी होते, ती कोणीही करूनच नये. अनावश्‍यक बदनामी टाळावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT