mister.mithil  Dainik Gomantak
गोवा

पैसे कमावण्यासाठी 'प्लान बी' तयार हवा; एका रिलवर 1 million views असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स 'मिथील'ने दिल्या टिप्स

हटके स्टाईलने विनोदी ढंगात सामाजिक विषयावर भाष्य करणारे मिथीलचे रील्स फॉलोवर्सच्या पसंतीस उतरत आहेत.

Ganeshprasad Gogate

Social Media Influencer mister.mithil First Relationship, Rakshabandhan, Mood Swings, Men Will Be Men अशा एकाहून एक सरस विनोदी रील्सने इंस्टावर धुमाकूळ घालणारा mister.mithil म्हणजेच मिथिल लिंगुडकर सध्या युवा वर्गात चांगलाच चर्चेत आहे.

हटके स्टाईलने विनोदी ढंगात सामाजिक विषयावर भाष्य करणारे मिथीलचे रील्स फॉलोवर्सच्या पसंतीस उतरत आहेत. गोमंतकच्या 'इन्फ्लुएन्सर्स मीट'मध्ये आम्ही त्याला जे प्रश्न विचारले त्याला उत्तर देत त्याने त्याचा आतापर्यंतचा प्रवास खुमासदार शैलीत उलगडून सांगितला.

पर्सनल लाईफ/ शिक्षण-

मिथिल म्हापसा नजीकच्या काणका, डिमेलो वाडो इथला रहिवासी असून  तो म्हणाला, ''मी मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलंय. सध्या मी व्हेस्पा सेल्समध्ये कार्यरत आहे. अभिनयाचा वारसा मला आईकडून मिळाला असून माझा मामा देखील उत्तम अभिनय करतो. अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळाल्याने गावातील नाटकांत मी छोटे मोठे रोल करायचो. माझी हीच आवड मला इन्स्टा इन्फ्लुएन्सर्स पर्यंत घेऊन आली.''

• सुरूवात कुठून आणि कशी झाली?

अभिनयाचा वारसा लाभल्याने "इंस्टावर रिल्स करून तरी बघू" अशा भावनेने मी पहिला रिल्स तयार केला. अर्थात या निर्णयाला घरातून बराच सपोर्ट मिळाला. व्हिडीओ शूट करण्यासाठी भावाचा आयफोन घेऊन सामाजिक विषयावर एक व्हिडीओ तयार केला.

पहिलाच व्हिडीओ असल्याने थोडासा गडबडलो होतो पण आईवडील आणि मित्र मंडळींच्या प्रोत्साहनामुळे काम करताना मजा आली. मला आठवतं माझ्या पहिल्या व्हिडिओला 200 Views आणि 50 Likes होते.

कमेंट्सचा 'असाही' पाऊस-  

त्यानंतर मी रिल्स तयार करताना सातत्य राखत सामाजिक, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरचे व्हिडीओ करायचे हे पक्कं केलं होतं. एक आठवण सांगावीशी वाटते की, म्हापशाचा बोडगेश्वर आणि शिरगांवच्या लईराई देवस्थानची माहिती सांगणारा एक व्हिडीओ केला होता.

पण व्हिडिओमधील माझ्या बोलण्याचा आणि मी काय मांडतोय याचा रोख बऱ्याच जणांना न समजल्याने उलट-सुलट कमेंट्स पडल्या. काहींनी खूपच ट्रॉल केलं. पण त्यानंतर मात्र मला लोकांसमोर कशारितीने विषय मांडावा याचा चांगला अंदाज आला.

त्या कमेंट्स मला खूप काही शिकवून गेल्या. 'आत्महत्या रोखा' आणि 'ड्रग्ज' या विषयांवरचे माझे व्हिडीओ छान व्हायरल झालेत. दोन्ही व्हिडीओंना प्रत्येकी एक-दीड लाख Views असून पन्नास-साठ हजार Likes  मिळालेत.

  शूट करताना...

तसं तर शूट दरम्यान कधी काही अडचणी आल्या नाहीत पण सुरुवातीच्या काळात मान्सून सिझनमध्ये व्हिडीओ तयार करताना मध्येच एखादी पावसाची सर यायची आणि सगळा विचका करून जायची. शूटिंग दरम्यान पावसासोबत वाऱ्याचाही बरच त्रास जाणवायचा. आता मात्र हवामानाचा एकंदरीत अंदाज बघूनच शूटसाठी बाहेर पडतो.

सामग्रीपेक्षा विषय दर्जेदार हवा-

सध्या मी बघतोय बरेच जण रिल्सच्या नादात आयफोन खरेदी करतात किंवा रिल्स तयार करण्यासाठी आयफोन हवाच असा त्यांचा अट्टाहास असतो. पण माझ्यामते महागड्या फोनपेक्षा तुम्ही ज्या विषयावर रिल्स तयार करणार आहात तो विषय दर्जेदार हवा.

रिल्स बघून झाल्यावर प्रेक्षकांना त्या रिल्समधून काहीतरी चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याचं समाधान तुम्हाला मिळायला हवं. Equipment पेक्षा Subject वर मेहनत घ्या. ती मेहनत तुम्हाला पुढं घेऊन जाईल.

• तरूणांना एवढंच सांगू इच्छितो...

सोशल मीडिया हे गतिमान, दररोज बदलत जाणारे आणि अस्थिर माध्यम आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व यंग ब्रिगेडला सांगू इच्छितो की काम करताना संयम बाळगणं फार महत्त्वाचं आहे.

त्याचप्रमाणे लोकांची भीड न बाळगता सातत्य राखणे हेही महत्त्वाचे ठरतं.  या क्षेत्रात तुम्हाला चांगलं आणि वाईट म्हणणारे समोरासमोर भेटतीलच, परंतु आपण चांगलं तितकं वेचून घेऊन अभ्यास करत पुढे जात राहणं महत्त्वाचं असतं.

तसंच या क्षेत्रावर 'उत्पन्नाचे माध्यम' म्हणून विसंबून राहणं माझ्यामते चुकीचं ठरेल. सोशल मीडियावर सक्रिय होण्यासोबतच तुमचा इनकमचा 'प्लॅन बी' तयार हवाच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT