Mauvin Godinho  Dainik Gomantak
गोवा

GIDC Plots: महिलांसाठी खुशखबर! ‘आयडीसी’मध्ये महिला उद्योजकांसाठी 30% प्लॉट्स आरक्षित! मंत्री गुदिन्हो यांची घोषणा

Mauvin Godinho: मंत्री गुदिन्हो म्हणाले की, मागील ‘आयडीसी’च्या बोर्ड बैठकीत लहान प्लॉट हे महिलांसाठी ३० टक्के आरक्षित ठेवण्याचा ठराव संमत केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Women industrial opportunities Goa

पणजी: गोव्याच्या उद्योग क्षेत्रात महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. महिलांसाठी औद्योगिक वसाहतीतील लहान प्लॉट्स ३० टक्के आरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज जाहीर केला. या निर्णयामुळे महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक जमीन सुलभ रितीने होणार असून, महिलांच्या उद्योजकीय विकासाला चालनाही मिळणार आहे.

एमएसएमई डीएफओ - गोवा, भारत सरकार व द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम), नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमएसएमईचे सामर्थ्य उलगडणे: संधी आणि पुढील दिशा’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मंत्री माविन गुदिन्हो यांनी महिलांच्या उद्योजकीय विकासाबद्दल विचार मांडले.

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, मागील ‘आयडीसी’च्या बोर्ड बैठकीत लहान प्लॉट हे महिलांसाठी ३० टक्के आरक्षित ठेवण्याचा ठराव संमत केला आहे. महिलांना आम्ही प्राधान्य देणार असून लवकरच हे धोरण देखील तयार केले जाईल.

या आरक्षणामुळे महिला उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी अधिक संधी मिळतील. महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढे येणे महत्त्वाचे असून, या माध्यमातून महिला सक्षम होण्यास मदत होईल.

व्यवसाय क्षेत्रात येणाऱ्या महिला आणि युवकांना स्टार्टअप योजनांचा लाभ घेण्यासाठी माहिती आणि जागरूकतेची आवश्यकता आहे. अशा कार्यशाळांच्या माध्यमातून या योजना पोहोचतात. या उद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर अधिक आत्मविश्वासाने नवीन उद्योजक उद्योग सुरू करू शकतील,असे उद्योगमंत्री म्हणाले.

‘मायक्रो फायनान्स’चा मिळेल लाभ!

लहान उद्योग करणाऱ्या महिलांना आणि पुरुषांनाही ‘मायक्रो फायनान्स’चा फायदा मिळावा, यासाठीही विशेष योजना आहेत. विशेषकरून महिलांनी व्यवसाय सुरू केला तर त्या इतर महिलांना देखील व्यवसायात आणू शकतात, असे मत मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केले असून यामुळे आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रगती साधता येईल. महिलांसाठी औद्योगिक प्लॉट्सचे आरक्षण हे धोरणात्मक पाऊल आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे. ‘नाबार्ड’च्या योजनांसाठीही महिलांना प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT